शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

अभिजितचे मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:32 IST

ट्युशनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या अभिजित टेकाम या सहावीतील विद्यार्थ्याचा खून झालेल्या अवस्थेत शनिवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

ठळक मुद्देशाळकरी विद्यार्थ्याचा खून : सुरजनगर परिसरावरच फोकस, दहा जणांची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ट्युशनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या अभिजित टेकाम या सहावीतील विद्यार्थ्याचा खून झालेल्या अवस्थेत शनिवारी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आतापर्यंत दहा ते बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात आल्याची माहिती आहे. तसेच खुनाचा धागाही पोलिसांना गवसला.ट्युशन सुटल्यानंतर सायंकाळी अभिजित हा सुरजनगर परिसरात गेला कसा, त्याच्यासोबत नेमके किती जण होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अभिजितची सायकल याच भागात आढळून आली. त्यावरून पोलिसांनी अभिजितच्या मारेकºयांचा शोध स्थानिक परिसरावरच केंद्रीत केला आहे. मारेकरी हे थिनर अथवा बॉन्डचा नशा करणारे असल्याचे स्पष्ट आहे. त्याच अनुषंगाने पोलीस पथकांनी तपास सुरू केला असून टोळीविरोधी पथकांनी सहा ते सात संशयितांना तर वडगाव रोड पोलिसांच्या शोध पथकाने चार जणांंना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र पोलिसांना अधिकृत कबुली मिळत नसल्याने या गुन्ह्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. अभिजितचे खुनी शोधण्यासाठी सायबर शाखेतील तंत्रज्ञांचीही मदत घेतली जात आहे. घटनास्थळावर बोटांंचे ठसे घेण्यासाठी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. श्वान प्रशिक्षणाला गेले असल्याने ते तपासाचे आयुध वापरण्यात आले नाही. मात्र पोलिसांच्या स्थानिक नेटवर्कच्या जोरावरच हा गुन्हा उघडकीस येईल, असा दावा एसडीपीओ पीयूष जगताप, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी केला.अल्पवयीन व्यसनाधीनतेकडेशहरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहेत. विविध अमली पदार्थांचा नशा मुलांसाठी घातक ठरत आहे. त्याच प्रमाणेच मोबाईल व इंटरनेटचा अतिरेकी वापरही अल्पवयीन मुलांसाठी धोकादायक आहे. कमी वयात प्रौढासारखे वागणारी मुले डोकेदुखी ठरत आहे. एकांताच्या शोधात शाळकरी मुले-मुली शहराबाहेर पडताना दिसत आहे. यातूनच गंभीर घटना होत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळेच गत आठवड्यात सामूहिक बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.