आमीर खान आज उमरखेड तालुक्यात
By Admin | Updated: April 26, 2017 00:07 IST2017-04-26T00:07:30+5:302017-04-26T00:07:30+5:30
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी अभिनेता आमीर खान बुधवारी उमरखेड तालुक्यात येत आहे.

आमीर खान आज उमरखेड तालुक्यात
उमरखेड : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी अभिनेता आमीर खान बुधवारी उमरखेड तालुक्यात येत आहे. बंदीभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम एकंबा व कृष्णापूर या दोन गावांना भेटी देणार आहे. आमीर खान येणार असल्याची माहिती मिळताच उत्साह संचारला आहे.
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत उमरखेड तालुक्यातील एकंबा आणि ढाणकीजवळील कृष्णापूर सहभागी झालेले आहेत. या गावांची पाहणी करण्यासाठी चित्रपट अभिनेता आणि पाणी फाऊंडेशनचे आमीर खान बुधवार २६ एप्रिल रोजी येत आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा दौरा गुप्त ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी चित्रपट निर्माते सत्यजीत भटकळ यांनी या दोन्ही गावांना भेट देऊ पाहणी केली. तसेच जेवली व कृष्णापूर या गावी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)