जिल्ह्यात ६० महा-ई-सेवा केंद्रात आधार नोंदणी सुरू
By Admin | Updated: August 14, 2014 00:08 IST2014-08-14T00:08:04+5:302014-08-14T00:08:04+5:30
ज्या नागरिकांची झाली नाही, त्यांना आधार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात ६० महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे. मागील ६ महिने दीड लाख लोकांची यशस्वीपणे आधार नोंदणी करण्यात आली

जिल्ह्यात ६० महा-ई-सेवा केंद्रात आधार नोंदणी सुरू
यवतमाळ : ज्या नागरिकांची झाली नाही, त्यांना आधार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात ६० महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे. मागील ६ महिने दीड लाख लोकांची यशस्वीपणे आधार नोंदणी करण्यात आली असून, इच्छुक नागरिकांनी आपल्या आधार नजीकच्या आधार केंद्रात जाऊन आधार नोंदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.
नागरिकांना आधार नोंदणीसाठी पुढीलप्रमाणे सहा-ई-केंद्र-सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील व तालुक्यातील नागरिकांना तेथील आधार केंद्रावर आधार नोंदणी करता येणार नाही. यवतमाळ नितीन दुधे, बाजोरिया यांच्या दवाखान्याजवळ, दत्त चौक, मनोज पसारकर घाटंजी रोड भोसा नाक्याजवळ, यवतमाळ. कळंब येथे रामदास वानखेडे (पंचायत समिती समोर). दारव्हा येथे प्रवीण ठवरे (स्टेट बँकजवळ), दिग्रस येथे अफजल खान, पुसद येथे नीलेश राठोड (गायमुख रोड) तसेच डुबेवार ले-आऊटमध्ये स्वप्नील महाजन यांच्याशी संपर्क साधावा.
महागाव येथे प्रदीप गंगमवार, शिवाजी चौक, उमरखेड येथे संतोष कांबळे (मेन रोड), उमरखेड माधव चौधरी, आर्णी येथे देवेंद्र बरडे (तहसील कार्यालयाजवळ), सावळी सदोबा येथे सुदाम चव्हाण, घाटंजी व्यंकटेश वार, केळापूर इम्रान खान, राजेश नांदूरकर (मोहाडा, ता. केळापूर), वणी येथे सचिन ठाकरे (तहसील कार्यालयाजवळ), सुरेंद्र नालमवार (चोरडीया कॉम्प्लेक्स), नागपूर रोड वणी, मारेगाव येथे नौलखा खारेडी वकारी ब्लॉक नं. ४ घोंसा रोड, मारेगाव आदी आधार कार्ड केंद्र शासनाने सुरू केले आहेत.
आदींना आधार केंद्रासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या केंद्रावर आधार नोंदणीशिवाय यापूर्वी आधारकार्ड नोंदणी, नाव पता याबाबत काही चुका असल्यास त्या सुधारून मिळेल. जिल्ह्यात बाभूळगाव, नेर, राळेगाव व झरी जामणी या तालुक्यातही लवकरच ई-सेवा केंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिली. अद्यापही जे नागरिक आधारकार्ड पासून वंचित असतील अशांनी त्वरित आपल्या नजीकच्या आधार केंद्राशी संपर्क साधून आधार कार्ड काढून घ्यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)