अबब, सोयाबीनच्या एका झाडावर २५ अळ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:36 IST2017-09-02T21:36:12+5:302017-09-02T21:36:29+5:30

Aab, 25 larvae on a soybean tree! | अबब, सोयाबीनच्या एका झाडावर २५ अळ्या!

अबब, सोयाबीनच्या एका झाडावर २५ अळ्या!

ठळक मुद्देढगाळी वातावरणाने सोयाबीन पिकावर पाने खाणाºया अळीने महाहल्ला चढविला आहे. ही कीड नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधीही कुचकामी ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ढगाळी वातावरणाने सोयाबीन पिकावर पाने खाणाºया अळीने महाहल्ला चढविला आहे. ही कीड नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधीही कुचकामी ठरली. शेतातील संपूर्ण सोयाबीनच फस्त होत असल्याने शेतकरी चिंतीत आहेत.
जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सततच्या ढगाळी वातावरणाने हिरव्याकंच सोयाबीनवर कीडीने आक्रमण केले आहे. यामुळे रातोरात सोयाबीनचे शेत फस्त होत आहे.
वाई हातोला येथील फैजान खान युनूस खान यांच्या शेतात तर सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोयाबीनवर कीटकनाशक फवारले. मात्र या औषधालाही अळीचे आक्रमण पुरून उरले आहे. झाडावर शेंगा कमी आणि अळ्या जास्त, अशी स्थिती निर्माण झाली. रात्रीतून अळीने संपूर्ण शेत फस्त केले आहे. असाच अनुभव अनेक शेतकºयांना येत आहे.
कीटकनाशकात भेसळ?
शेतात औषधी फवारल्यानंतरही अळ्या मेल्या नाही. यामुळे पिकापेक्षा अळ्यांचीच रोग प्रतिकारकशक्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे. औषधामध्ये भेसळ झाली असावी, असा संशय अनेक शेतकºयांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने या प्रकारातील तथ्य पुढे आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Aab, 25 larvae on a soybean tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.