शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

अंत्यसंस्काराहून परतताना झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू 

By विलास गावंडे | Updated: September 12, 2022 18:47 IST

अंत्यसंस्काराहून परतताना अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. 

डोंगरखर्डा (यवतमाळ) : अंत्यसंस्काराहून दुचाकीने गावी परतत असताना झालेल्या अपघातात मायलेकं ठार झाल्याची घटना पांढरकवडा मार्गावरील उमरी रोड येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सुरेखा महादेव बताले (४०) व शुभम महादेव बताले (२०) रा.डोंगरखर्डा ता. कळंब अशी मृतांची नावे आहेत.

महादेव बताले यांच्या काकू ताईबाई नानाजी बताले (रा. किन्हाळा ता. पांढरकवडा) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हे तिघेही गेले होते. रात्री महादेव बताले हे दुसऱ्या एका दुचाकीने समोर निघाले. तर सुरेखा व शुभम हे दोघे एम.एच.२९/ए.एफ.५३९५ या क्रमांकाच्या दुचाकीने येत होते. दरम्यान, उमरी रोड जवळ एम.एच.२९/बी.यू.७८६३ या क्रमांकाच्या पीकअप वाहनाची धडक दुचाकीला बसली.

गंभीर जखमी झालेल्या सुरेखा व शुभमला नागरिकांनी उमरी रोड येथील रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या दोघांनाही पोहोचण्यास उशीर होत असल्याने समोर निघालेले महादेव बताले हे काही अंतरावर थांबले. तेथून त्यांनी शुभमच्या मोबाईलवर कॉल केला. हा कॉल मदत करणाऱ्यांपैकी एकाने घेतला. त्यावेळी त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. तेथूनच ते रुग्णालयात पोहोचले.

डोंगरखर्डाची बाजारपेठ बंदएकाच कुटुंबातील दोन सदस्यांच्या अपघाती मृत्युमुळे सोमवारी डोंगरखर्डा येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शोकाकुल वातावरणात शुभम व सुरेखा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा यांच्या मागे पती, मुलगी व आप्त परिवार आहे.

 

टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघातDeathमृत्यू