शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात ९५ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 18:08 IST

'झेडपी'च्या शाळांमध्ये सुविधांचा अभाव : नवीन वर्गखोली, स्वच्छतागृह, सुरक्षा भिंत आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात ३४ पेक्षा जास्त शाळांची पडझड झाली आहे. त्यामधील ९५ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असून, या कामाला कधी मंजुरी मिळेल, याची प्रतीक्षा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढवायची असेल तर शाळांतील सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. दुरुस्तीसोबतच ७१ नवीन वर्गखोल्या, वर्गखोल्या. १२६ स्वच्छतागृहे तसेच १२ हजार ५११ रनिंग मीटर सुरक्षा भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आजकाल शिक्षणाकरिता अनेकांचा कल शहराकडे जास्त आहे. त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आपला मुलगा शिकावा अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा वाढत चालली आहे. त्यासाठी शैक्षणिक खर्च करण्याची पालकांची तयारी आहे.

 

आधुनिक शिक्षण, विविध प्रकारच्या सुविधा, हे यामागचे कारण आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे. तरीसुद्धा पालकांची आर्थिक परिस्थिती, काही ठिकाणी मिळत असलेले चांगले शिक्षण यासह इतर कारणांमुळे या शाळांमध्ये काही विद्यार्थी आजही टिकून आहेत. ही जिल्हा परिषद शाळांची जमेची बाजू आहे. या बाबींचा विचार करता तेथील विद्यार्थ्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३५ शाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांना चांगल्या वर्गखोल्या, शौचालय आदींसह आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत. काही ठिकाणी तर शाळा पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्गखोल्यांना भरपूर कालावधी झाल्याने तसेच अतिवृष्टी, पुरामुळे पडझड झाली. यासंदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट करून बांधकाम विभागाच्या प्राकलन रकमेसह जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर वर्गखोली निर्लेखनास मंजुरी देण्यात आली.

 

पडक्या वर्गखोल्या पाडायला परवानगी तर मिळाली. मात्र, निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्या वर्गखोल्या पाडण्यात आल्या नाहीत. आता यूडायसच्या संकलनातून सुविधांच्या अभावाबाबतची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने ९५ वर्गखोल्यांची दुरुस्ती, ७१ नवीन वर्गखोल्या, मुली व मुलांसाठी मिळून १२६ स्वच्छतागृहे तसेच १२ हजार ५११ रनिंग मीटर सुरक्षा भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. आता या प्रस्तावाला केव्हा मंजुरी मिळणार, याकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शाळांना निधीसाठी आखडता हात का?■ शिक्षण विभागात अनेक बदल होत आहे, याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. परंतु ग्रामीण भागातील सरकारी शाळांना निधीसाठी आखडता हात का घेतला जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. अत्यावश्यक सुविधा, साहित्य मिळत नाही. याकडे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.■ विद्यार्थ्यांची रोडावलेली संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उन्हाळ्यात शिक्षकांवरही विद्यार्थ्यांसाठी भटकंतीची वेळ आली होती.

'शाळांमध्ये कोण-कोणत्या बाबींची आवश्यकता आहे. याबाबत वरिष्ठांकडून माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार सर्व शाळांची माहिती घेतली. डाटा तयार करून प्रस्ताव पाठविण्यात आला. यावर पुढील निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल.'- विलास जाधव, गटशिक्षणाधिकारी, दारव्हा 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी