यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डातून पुन्हा ९ जणांना सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:54 IST2020-05-12T12:53:41+5:302020-05-12T12:54:04+5:30

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ९ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरवातीला या ९ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. मात्र १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असता सर्व ९ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे.

9 more people discharged from Yavatmal's isolation ward | यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डातून पुन्हा ९ जणांना सुट्टी

यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डातून पुन्हा ९ जणांना सुट्टी


लोकम न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ९ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरवातीला या ९ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. मात्र १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असता सर्व ९ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे.
तसेच इंदिरा नगर येथील एका जणाचा रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती हा पॉझेटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आला होता आणि तो संस्थात्मक विलगीकरणात भरती आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात अ‍ॅक्टिव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४५ आहे. तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या २३ नमुन्यांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. तसेच उमरखेड येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या (लो रिस्क कॉन्टॅक्ट) ५८ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: 9 more people discharged from Yavatmal's isolation ward