‘९२ डीबी’चा अद्यापही वावर आहे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:56 IST2019-02-06T23:56:04+5:302019-02-06T23:56:25+5:30
खाकी वर्दीत लुटमार करून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या वादग्रस्त ‘९२ डीबी’च्या सदस्यांचा अद्यापही अवधूतवाडी पोलीस ठाण्यात वावर आहे काय? अशी विचारणा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी केली.

‘९२ डीबी’चा अद्यापही वावर आहे काय ?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खाकी वर्दीत लुटमार करून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या वादग्रस्त ‘९२ डीबी’च्या सदस्यांचा अद्यापही अवधूतवाडी पोलीस ठाण्यात वावर आहे काय? अशी विचारणा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी बुधवारी केली.
अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण बुधवारी करण्यात आले. त्यासाठी एसपी राज कुमार सकाळी ११ पासून दुपारी ३.३० पर्यंत या ठाण्यात होते. तेथे जाताच त्यांना ‘९२डीबी’च्या कारनाम्यांचे अचानक स्मरण झाले व या डीबीचा पूर्वीप्रमाणे अजूनही अवधूतवाडी ठाण्यात वावर तर नाही याची खातरजमा एसपींनी तेथील ठाणेदारांकडून करुन घेतली. या ‘९२डीबी’ने कुरिअरची एक कोटी ७० लाखांची रोकड लुटल्याची चर्चा आहे. रेकॉर्डवर ती चार ते पाच लाख रुपये नोंदविली गेली. त्यानंतर एका पॉश फार्म हाऊसवर हायप्रोफाईल धाड मॅनेज करून ३० लाख उकळले. पहिल्या कारनाम्यात रेकॉर्डवर आलेल्या पोलिसाचा निलंबन काळात अवधूतवाडीत खुलेआम वावर होता.
पॉश फार्म हाऊस प्रकरणात ‘९२डीबी’च्या तीन सदस्यांना निलंबित करण्यात आले. यातील एकाला यापूर्वी वाटमारीत निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही त्याचा अवधूतवाडीत वावर होता.