८८४ जणांचे रक्तदान

By Admin | Updated: August 17, 2015 02:34 IST2015-08-17T02:34:41+5:302015-08-17T02:34:41+5:30

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ येथे शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

884 blood donation | ८८४ जणांचे रक्तदान

८८४ जणांचे रक्तदान

अपघात विमा : अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ आयोजन
यवतमाळ : माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ येथे शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २८ महिलांसह ८८४ जणांनी रक्तदान केले. राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा मद्य विक्रेता संघ आणि डिस्ट्रीक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिर पार पडले.
आमदार मदन येरावार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विलास देशपांडे, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त अमृत निखाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, एसपी अखिलेशकुमार सिंह, सीईओ डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह नगरसेवक सुमित बाजोरिया, मोहन देशमुख, सुभाष यादव आदींनी या शिबिराला भेट दिली.
रक्तदात्यांना एक लाख रुपयांचा अपघाती विमा प्रमाणपत्र आणि टी-शर्ट भेट देण्यात आली. डोनर कार्डही दिले. रक्तदात्यांच्या नावाची यादी असलेली पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. रक्तदानासाठी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एकनील ब्लड बँकेच्या चमूचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी पंकज नानवानी, बंटी जयस्वाल, राम बेले, गुड्डू उदासी, हिरा मिश्रा यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी बन्सीलाल छत्ताणी, मनोहर तिलवाणी, अमित धलवार, दिलीप बजाज, संजय बुरले, अतुल ढोले, गजानन बट्टावार, श्रीकांत खडतकर, प्रसाद चौधरी, प्रदीप मंगताणी, गोपाल बख्तीयार, रवी धांदे, शशी यादव, अतुल राऊत, साजनदास उदासी यांच्यासह उत्पादन शुल्क विभागाचे झाडे, भटकर, शिरभाते आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: 884 blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.