शेतकºयांचे ‘वसंत’कडे ८० लाख अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:55 IST2017-09-04T23:55:12+5:302017-09-04T23:55:37+5:30

तालुक्यातील शेतकºयांचे वसंत सहकारी साखर कारखान्याकडे उसाचे ८० लाख रुपये थकित असून, ....

80 lakhs of farmers' 'spring' | शेतकºयांचे ‘वसंत’कडे ८० लाख अडले

शेतकºयांचे ‘वसंत’कडे ८० लाख अडले

ठळक मुद्देउसाचे पैसे : महागाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील शेतकºयांचे वसंत सहकारी साखर कारखान्याकडे उसाचे ८० लाख रुपये थकित असून, या पैशासाठी शेतकºयांनी कारखाना अध्यक्षांपासून संचालकांपर्यंत मागणी केली. परंतु उपयोग झाला नाही. कारखान्याची स्थिती नाजूक असल्याने पैसे मिळतील की नाही, अशी शंका शेतकºयांना आहे.
महागाव तालुक्यातील करंजखेड येथील सुभद्राबाई माणिकराव भांगे यांनी वसंत साखर कारखान्याला १०० टन ऊस दिला होता. २०१६ पासून त्यांन अलिकडे एक लाख रुपये देण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पैशाची गरज आहे. परंतु कारखान्याजवळच पैसा नाही तर द्यायचा कोठून अशी भूमिका प्रशासनाने घेतली. भांगे यांनी वकिलामार्फत कारखान्याला नोटीस पाठविली होती. त्यानंतर त्यांना एक लाख रुपये देण्यात आले. पहिला हप्ता म्हणून एक हजार ८६२ रुपये बिल काढण्यात आले. परंतु नॅचरल शुगरने २५०० रुपये रोखीने पैसे दिले. वसंतने २२५० रुपये देऊ केले होते. आता हा फरक ३९० रुपये असून, फरकाचे पैसे शेतकºयांना घेणे आहे. या सर्व शेतकºयांचे ८० लाख रुपये कारखान्याकडे आहे. परंतु आर्थिक अडचणीचा मुद्दा पुढे करून टाळाटाळ होत आहे. भाजपाचे अ‍ॅड़ माधवराव माने कारखान्याचे अध्यक्ष झाल्यावरही स्थिती कायम आहे.
साखर कारखान्याची स्थिती गंभीर
पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून कामगारांना पगार मिळाले नाही. कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. अशा स्थितीत आता कारखाना भाजपाने ताब्यात घेतला. मात्र कारखाना सुरू होण्याची सध्या तरी कोणतीही चिन्हे दिसत नाही. याचा फटका महागाव, पुसद, उमरखेड यासह मराठवाड्यातील तालुक्यांना बसणार आहे.

Web Title: 80 lakhs of farmers' 'spring'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.