वणीकरांसाठी ७५ कोटींचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:03 IST2017-12-11T22:03:24+5:302017-12-11T22:03:46+5:30
वणी शहराला पाणी पुरवठा करणाºया निर्गुडा नदीचा जलस्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहे. यावर मात करण्यासाठी वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

वणीकरांसाठी ७५ कोटींचा प्रकल्प
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : वणी शहराला पाणी पुरवठा करणाºया निर्गुडा नदीचा जलस्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहे. यावर मात करण्यासाठी वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ७५ कोटींच्या या प्रकल्पाला आयुक्त कार्यालयाने तांत्रिक मान्यता दिली आहे. १९ डिसेंबरला मुख्यमंत्री आर्थिक मंजुरी देणार आहेत.
सध्या वणी शहराला पाणी पुरवाठा करण्यासाठी निर्गुडा नदीचाच एकमेव आधार आहे. या नदीचे पाणी मार्चपर्यंतच पुरणार आहे. यावर मात करण्यासाठी स्वर्ण जयंती योजनेतून पाणी पुरवठ्याचा नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.
७५ कोटींचा हा प्रकल्प आहे. पुढील ५० वर्षांच्या दृष्टीने त्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी वर्धा नदीवरून ११ किलोमिटरची नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. पाच नवीन टाक्या आणि गावामध्ये १४४ किलोमिटर पाईप लाईनचे नवीन जाळे विणले जाणार आहे.
या कामासाठी १५ कोटींचा खनिज विकास निधी वापरला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणी मिळावे, असे नियोजन यातून करण्यात आले आहे. जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभिंयंता एस. एस. पारथळ यांनी याला सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
वर्धा नदीतून पाणी उपसा केल्यानंतर रांगणा गावाजवळ बंधारा टाकला जाणार आहे. जॅकवेलने पाणी खेचले जाणार आहे. त्याकरिता चार तरंगते मोटरपंप बसविले जाणार आहे. वणी शहरात या पाण्यासाठी नवीन फिल्टर प्लाण्ट उभा करण्यात येणार आहे.
नळ योजनेच्या कामकाजाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आर्थिक मान्यता बाकी आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे. त्या दृष्टीने नगरपरिषदेने काम पूर्ण केले आहे.
- तारेंद्र बोर्डे,
नगराध्यक्ष वणी