७१० उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा
By Admin | Updated: April 20, 2016 02:30 IST2016-04-20T02:30:56+5:302016-04-20T02:30:56+5:30
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ३७ पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली. या परीक्षेकरिता राज्यभरातील ६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली होती.

७१० उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा
पोलीस भरती : ३७ जागा, आज निकाल
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ३७ पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली. या परीक्षेकरिता राज्यभरातील ६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली होती. प्रारंभीच्या शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेमध्ये ५ हजार ७५० अपात्र ठरले. यातील पात्र ७५० उमेदवारांची लेखी परीक्षा मंगळवारी पार पडली. या परीक्षेचा निकाल बुधवारी २० एप्रिल रोजी पोलीस दलाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार आहे. परीक्षास्थळाच्या बाहेरही निकालाच्या प्रती लावल्या जाणार आहेत.
पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाल्यापासून राज्यभरातील युवकांचे जत्थे यवतमाळात दाखल झाले होते. प्रारंभी शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. यामध्ये धावणे, गोळाफेक, लांब उडी, उंची आणि छातीचे मोजमाप घेण्यात आले. शारीरिक क्षमता चाचणीचा निकाल त्याच ठिकाणी जाहीर करण्यात आला.
स्पर्धेतून बाद झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्याचवेळी जाहीर करण्यात आला. यासाठी सतत विविध राउंड घेण्यात आले. यामधून ६ हजार ५०० उमेदवारांपैकी ५ हजार ७५० उमेदवार बाद झाले. तर लेखी परीक्षेकरिता ७५० उमेदवार पात्र ठरले होते. यापैकी ४० विद्यार्थी परीक्षेत गैरहजर राहीले. पात्र ठरलेल्या ७१० उमेदवारांची यवतमाळातील पोलीस मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात आली. मंगळवारी सकाळी परीक्षा पार पडली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या उपस्थितीत ही परीक्षा घेण्यात आली. (शहर वार्ताहर)