७०० जीन्स पॅन्ट अन् २५० टी-शर्ट लंपास

By Admin | Updated: December 20, 2015 02:28 IST2015-12-20T02:28:47+5:302015-12-20T02:28:47+5:30

कापड दुकान फोडून चोरट्याने ७०० जीन्स पॅन्ट, २५० टी-शर्ट, २० जॉकेट आणि सुमारे ३०० शर्ट लंपास केल्याची घटना दारव्हा येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.

700 jeans pants and 250 t-shirts lamps | ७०० जीन्स पॅन्ट अन् २५० टी-शर्ट लंपास

७०० जीन्स पॅन्ट अन् २५० टी-शर्ट लंपास

दारव्ह्याची घटना : कापड दुकानातून साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरला
दारव्हा : कापड दुकान फोडून चोरट्याने ७०० जीन्स पॅन्ट, २५० टी-शर्ट, २० जॉकेट आणि सुमारे ३०० शर्ट लंपास केल्याची घटना दारव्हा येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. या दुकानातून चोरट्याने सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
येथील आर्णी मार्गावरील पेट्रोलपंपाजवळ एका कॉम्प्लेक्समध्ये कुणाल मेन्सवेअर हे रेडिमेड कापडाचे दुकान आहे. दुकानमालक कुंदन भास्करअप्पा बिबेकर रा.जिरापुरे कॉलनी यांनी शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि घरी गेले. शनिवारी सकाळी दुकानात आले तेव्हा दुकानाचे शटर तोडलेले दिसून आले. आत जावून पाहतात तो काय दुकानातील लाकडी रॅक रिकाम्या दिसल्या. चोरी झाल्याचे तत्काळ लक्षात आले. चोरट्याने या दुकानातून पॅन्ट, शर्ट, जॉकेट, टी-शर्ट, इतर गारमेंट, एलसीडी टीव्ही आणि रोख १० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. दारव्हा शहरात एखाद्या कापड दुकानात एवढी मोठी चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 700 jeans pants and 250 t-shirts lamps