६५ हजार हेक्टरवरील पेरणी अडचणीत
By Admin | Updated: June 23, 2014 00:20 IST2014-06-23T00:20:22+5:302014-06-23T00:20:22+5:30
मृग नक्षत्रात पाऊस बरसेल या आशेवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची हिंमत केली. मात्र अद्यापही पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील पेरणी अडचणीत आली आहे.

६५ हजार हेक्टरवरील पेरणी अडचणीत
शेतकरी पेचात : मान्सूनची हुलकावणी
यवतमाळ : मृग नक्षत्रात पाऊस बरसेल या आशेवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची हिंमत केली. मात्र अद्यापही पाऊस बरसलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवरील पेरणी अडचणीत आली आहे.
जिल्ह्यात २ लाख २०० हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार होती. जिल्ह्यात ३७ मिमी पाऊस बरसताच शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला प्रारंभ केला. गत आठ दिवसात ६५ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ४० हजार हेक्टरक्षेत्र कपाशीच्या लागवडीचे आहे. तर १२ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. पाच हजार हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. यामध्ये ज्वारी आणि मूग, उडीदाच्या क्षेत्राचा समावेश आहे.
पेरणीनंतर पाऊस नसल्याने पेरणी करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ओलिताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केली. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे आहे.
मान्सूनची हुलकावणी
अरबी समुद्राकडून दाखल होणारे नैऋत्य मोसमी वारे, यावेळी बंगालच्या खाडीतून विदर्भात दाखल झाले आहेत. हा मान्सून विक आहे. साधारणत: २४ जूननंतर पूर्व विदर्भात मान्सूनची स्थिती भक्कम होणार आहे.