शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटींचा पीक विमा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देसर्वाधिक मदत सोयाबीन उत्पादकांना : कापूस, ज्वारी, उडीद, मूग आणि तुरीलाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी खरीप हंगामामध्ये पिकाचा विमा उतरविणाऱ्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मदतीस पात्र शेतकरी सोयाबीन उत्पादक असून कापूस, ज्वारी, उडीद, मूग आणि तूर उत्पादकांनाही पीक विम्याची मदत मिळणार आहे. विमा कंपनीने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विमा उतरविणारे चार लाख शेतकरी या पीक विम्याला मुकले आहे. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी तीन लाख ३६ हजार ५४९ हेक्टरसाठी विमा सुरक्षाकवच उभारले होते. त्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३५ कोटी रुपये विमा कंपनीकडे वळते केले होते. गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले. पात्र असलेल्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळामध्ये विम्याची ही रक्कम भिन्न आहे. याशिवाय, पात्र शेतकऱ्यांची संख्याही विभागण्यात आली आहे. कुठल्या शेतकऱ्यांना किती रुपयांची मदत मिळाली, याची माहिती कृषी विभागालाही सध्या उपलब्ध नाही. मिळालेली संपूर्ण रक्कम विमा कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली आहे. काही बँकांनी मदतवाटपाला सुरुवातही केली आहे. जिल्ह्यातील सर्वच पिके मदतीला पात्र ठरली आहे. जिल्ह्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या मदतीला पात्र ठरली आहे. एक लाख ९७ हजार ५१० शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यातील २५ हजार ४०४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना २४ कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला आहे.  तर, एक लाख सात हजार ६६ शेतकऱ्यांनी कापसाचा विमा उतरविला होता. यातील दहा हजार ६८४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना १२ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या ४३ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला. यातील दहा हजार ५९ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना तीन कोटी ९२ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. उडिदाचे उत्पादन घेणाऱ्या २६ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यातील ३२२ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांना सहा लाख ७९ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. मुगाची लागवड करणाऱ्या २६ हजार ९१७ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामधील १४५३ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना २८ लाख ४४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तुरीची लागवड करणाऱ्या ६७ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यामध्ये १३ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना सहा कोटी ६३ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. इतर शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागले आहे.  

असे आहेत मदतीला पात्र ठरलेले तालुक्यातील शेतकरी 

 आर्णी तालुक्यात ९२५ शेतकऱ्यांना ५१ लाख १५ हजार ९१५ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. बाभूळगाव चार हजार १२५ शेतकरी, चार कोटी ५९ लाख. दारव्हा एक हजार ९० शेतकरी ८६ लाख २३ हजार. दिग्रस १६९३ शेतकरी, १ कोटी २३ लाख. घाटंजी १६ हजार २१५ शेतकरी, १६ कोटी ६८ लाख. कळंब तीन हजार ९३ शेतकरी, एक कोटी २८ लाख. केळापूर सात हजार ४३२ शेतकरी, सात कोटी ४६ लाख. महागाव चार हजार ६९० शेतकरी, एक कोटी ५६ लाख. मारेगाव दोन हजार ४५४ शेतकरी, ८३ लाख. नेर ५०३ शेतकरी, ४६ लाख ९२ हजार. पुसद दोन हजार ९३ शेतकरी, एक कोटी ८७ लाख. राळेगाव दोन हजार २८१ शेतकरी, एक कोटी ४७ लाख. उमरखेड सात हजार ६६३ शेतकरी, चार कोटी आठ लाख. वणी १५६८ शेतकरी, ६७ लाख. यवतमाळ चार हजार १०० शेतकरी, दोन कोटी ८७ लाख. झरी जामणी १३६४ शेतकरी, ६९ लाख.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी