कृषी केंद्र संचालकास ६० हजारांनी लुटले
By Admin | Updated: March 15, 2015 00:23 IST2015-03-15T00:23:22+5:302015-03-15T00:23:22+5:30
दुचाकीने यवतमाळकडे जाणाऱ्या येथील एका कृषी केंद्र चालकाला डोळ्यात मिरची पावडर फेकून ६० हजाराने लुटले.

कृषी केंद्र संचालकास ६० हजारांनी लुटले
अकोलाबाजार : दुचाकीने यवतमाळकडे जाणाऱ्या येथील एका कृषी केंद्र चालकाला डोळ्यात मिरची पावडर फेकून ६० हजाराने लुटले. ही घटना यवतमाळ-अकोलाबाजार मार्गावर पांढरीजवळील वाघाडी नाल्याजवळ शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
विनोद रामराव लासेकर रा. साईबाबानगर यवतमाळ असे लुटल्या गेलेल्या कृषी केंद्र चालकाचे नाव आहे. त्यांचे अकोलाबाजार येथे कृषी केंद्र असून नेहमीप्रमाणे आज ते आपल्या घरी दुचाकीने जात होते. पांढरीजवळ मागाहून आलेल्या एका दुचाकीवरील तीन तरुणांनी त्यांना अडवून डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यांच्याजवळ असलेली बॅग घेवून चोरटे पसार झाले. या बॅगमध्ये ५५ ते ६० हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. तिघांनीही तोंडाला रूमाल बांधलेला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)