जमादाराच्या घरून ६० ग्रॅम दागिने लंपास

By Admin | Updated: August 7, 2014 00:02 IST2014-08-07T00:02:52+5:302014-08-07T00:02:52+5:30

पॉलिशच्या नावाखाली दोन भामट्यांनी पोलीस जमादाराच्या पत्नीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत बुधवारी दुपारी ११ वाजता घडली.

60 grams of jewelry from the house of the deceased | जमादाराच्या घरून ६० ग्रॅम दागिने लंपास

जमादाराच्या घरून ६० ग्रॅम दागिने लंपास

पॉलिशचे निमित्त : पत्नीला घातला गंडा
यवतमाळ : पॉलिशच्या नावाखाली दोन भामट्यांनी पोलीस जमादाराच्या पत्नीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत बुधवारी दुपारी ११ वाजता घडली.
वंदना राजेश तिवारी असे दागिने लंपास झालेल्या महिलेचे नाव आहे. राजेश तिवारी पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी सुटा-बुटात असलेले दोन तरूण त्यांच्याकडे आले. यावेळी दागिने चमकून देतो असे त्यांनी जमादार तिवारी यांना सांगितले. तसेच दागिने चमकविण्यासाठी कुठलेही शुल्क घेण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून चांदीचे ताट आणि ग्लास चमकविण्यासाठी दिले. त्यांनीही पावडर आणि हळद लावून ते चमकवून दिले. त्यानंतर हे तरूण तेथून निघून गेले.
दरम्यान बुधवारी दुपारी ते तरूण पुन्हा तिवारी यांच्याकडे आले. त्यावेळी राजेश तिवारी कर्तव्यावर होते. त्यांची पत्नी घरी होती. त्यांनी आपल्या हातातील ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चमकविण्यासाठी दिल्या. त्यांनी सुरूवातीला या बांगड्यांना पावडर लावले, त्यानंतर घरातून एक डबा आणि हळद आणायला सांगितली. त्यांनी डबा आणि हळद आणली. बांगड्यांना हळद घासून वंदना तिवारी यांनाच डब्यात ठेवण्यास सांगितले. दरम्यान थोड्यावेळाने बांगड्या पाण्याने स्वच्छ करण्याचा सल्ला देऊन ते तरूण निघाले. दरम्यान वंदना तिवारी यांनी शंका आली. त्यांनी डबा उघडून पाहिला तर त्यामध्ये बांगड्या नव्हत्या. केवळ हळदीची पेस्ट आढळून आली. हातचलाखी करून बांगड्या लंपास केल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ ही माहिती पती राजेश यांना दिली. तोवर चोरटे पसार झाले होते. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी वडगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 60 grams of jewelry from the house of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.