६३ हजार घरकुलांसाठी हवे ५९८ कोटी

By Admin | Updated: October 11, 2014 23:14 IST2014-10-11T23:14:13+5:302014-10-11T23:14:13+5:30

आर्थिक दारिद्र्यामुळे उभ्या आयुष्यात हक्काचे घर बांधता आले नाही. मात्र शासनाच्या योजनेतून त्यांचे स्वप्न सकारत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने ५८ हजार ६५६ कुटुंबांना हक्काचे

5,98 crores for 63 thousand houses | ६३ हजार घरकुलांसाठी हवे ५९८ कोटी

६३ हजार घरकुलांसाठी हवे ५९८ कोटी

यवतमाळ : आर्थिक दारिद्र्यामुळे उभ्या आयुष्यात हक्काचे घर बांधता आले नाही. मात्र शासनाच्या योजनेतून त्यांचे स्वप्न सकारत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने ५८ हजार ६५६ कुटुंबांना हक्काचे घर मिळले. तर ६३ हजार ४७६ कुटुंब प्रतीक्षेत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ५९८ कोटी रूपये लागणार आहेत. इतका मोठा निधी एकाच वर्षी मिळणे अशक्य आहेत. त्यामुळे निधीची तरतुद होईपर्यत या कुटुंबांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या मदतीने इंदिरा आवास योजनेतील घरकुल उभारले जात आहे. मात्र या घरकुलासाठी लागणारा निधी एकदम उभारणे अशक्य असल्याने दरवर्षी टप्प्या टप्प्याने घरकुल उभारले जात आहे. शासनाच्या निकषानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना घरकुल बांधुन दिले जाते. त्यासाठी जिल्ह्याची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. २००८ मध्ये घरकुलाची यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये १ लाख २२ हजार १२३ कुटुंबाचा समावेश होता. गत सहा वर्षात ४४ हजार ३१८ कुटुंबांचे घर पूर्ण झाले. १४ हजार ३०८ घरांच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. ६३ हजार ४७६ कुटुंबाचे घर अद्यापही तयार व्हायचे आहे. गत सहा वर्षाचा अनुभव लक्षात घेता पुढे आणखी इतकेच वर्ष लागतील असा अंदाज आहे.
एका घरकुलासाठी ९५ हजार रूपये अनुदान दिले जाते. यामध्ये लाभार्थ्याला ५ हजार रूपयाचे स्व:ताचे गुंतवायचे असतात. (शहर वार्ताहर)

Web Title: 5,98 crores for 63 thousand houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.