अल्पभूधारकांना ५५० कोटी कर्जमाफीचे संकेत

By Admin | Updated: June 12, 2017 01:56 IST2017-06-12T01:56:39+5:302017-06-12T01:56:39+5:30

राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा रविवारी केली असून यामुळे जिल्ह्यातील

550 crore loan waiver signs for the underprivileged | अल्पभूधारकांना ५५० कोटी कर्जमाफीचे संकेत

अल्पभूधारकांना ५५० कोटी कर्जमाफीचे संकेत

आशा पल्लवीत : एक लाख शेतकऱ्यांंना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा रविवारी केली असून यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५० कोटी रुपयांचे कर्जमाफ होण्याचे संकेत आहे. याचा लाभ एक लाख अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
उच्चाधिकार मंत्रीगटाबरोबर सुकाणू समितीची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना रविवारीच कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा बँकेच्या एक लाख दोन हजार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकडे ५५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या शेतकऱ्यांंना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग आजच्या घोषणेने मोकळा झाला आहे.
राष्ट्रीयकृत बँकांचा थकबाकीदार शेतकऱ्यांचा आकडा अद्यापही गुलदस्त्यात आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. सुकाणू समितीच्या बैठकीनंतर राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. कर्जमाफीचे धोरण काय असेल या संदर्भात आदेश पोहोचल्यानंतरच अनेक बाबी स्पष्ट होणार आहे.

Web Title: 550 crore loan waiver signs for the underprivileged