जिल्ह्यात कोरोनाचे ५५ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:27+5:30
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. सर्वाधिक १६ पॉझिटिव्ह यवतमाळातील आहे. दिग्रस ९, पुसद ७, झरीजामणी ५, वणी ४, महागाव ३, पांढरकवडा आणि आर्णी शहरात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दारव्हा शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे ५५ नवीन रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी ५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१३ इतकी झाली आहे. यापैकी १९५ जण होम आयसोलेशनमध्ये आहे. तर उपचाराने बरे झालेल्या ४२ जणांची कोविड केअर सेंटरमधून सुटी करण्यात आली आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. सर्वाधिक १६ पॉझिटिव्ह यवतमाळातील आहे. दिग्रस ९, पुसद ७, झरीजामणी ५, वणी ४, महागाव ३, पांढरकवडा आणि आर्णी शहरात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दारव्हा शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना मृत्यू झालेला नाही. सध्या ६६ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार ५७७ इतकी झाली आहे. तर एक हजार १०७ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात १५५ जण भरती झाले आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी दीडशे नमुने तपासणीला पाठविले. आतापर्यंत ४० हजार ८५२ नमुने तपासणीकरिता पाठविले. यापैकी ३९ हजार ९९४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहे. त्यात ३७ हजार ४१७ नमुने निगेटिव्ह आहेत. तर ८५८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.
जिल्हा कारागृहात दोन बंदी निघाले पॉझिटिव्ह
कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने गोदनी मार्गावर तात्पुरते कारागृह उघडले आहे. येथील दोन बंद्यांचे नमुने १७ ऑगस्टला तपासणीला नेले. त्यापैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती २१ ऑगस्टला मिळाली. आता त्यानंतर कारागृहातच सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. संथ गतीमुळे भीती व्यक्त होत आहे.