फायनान्समधून साडेपाच लाख लंपास

By Admin | Updated: August 7, 2015 02:23 IST2015-08-07T02:23:59+5:302015-08-07T02:23:59+5:30

फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून लॉकरमधील रोख पाच लाख ६५ हजार ८६० रुपये आणि...

5 million lacs from finance | फायनान्समधून साडेपाच लाख लंपास

फायनान्समधून साडेपाच लाख लंपास

पुसदची घटना : चोरटे श्रीरामच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पुसद : फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून लॉकरमधील रोख पाच लाख ६५ हजार ८६० रुपये आणि कर्जाची कागदपत्रे लंपास केल्याची घटना येथील मोतीनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरटे या कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
श्रीराम फायनान्स कंपनीचे कार्यालय येथील चांडक कॉम्प्लेक्समध्ये आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आॅफिस उघडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने ही माहिती व्यवस्थापकाला दिली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली असता कार्यालयातील एका लॉकरमधील काळ्या बॅगमध्ये ठेवलेले पाच लाख ६५ हजार ८६० रुपये लंपास झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
श्रीराम फायनान्स कंपनी शहरात डेली कलेक्शनचे काम करते. दिवसभर गोळा झालेले पैसे एजंट सायंकाळी येथे जमा करतात. रात्री ९ वाजेपर्यंत सदर कार्यालय सुरू असते. बुधवारी नेहमीप्रमाणे वसुलीचे पैसे कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवले होते. परंतु रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने पैसे लंपास केले. तसेच या बॅगमध्ये असलेले कर्जाचे कागदपत्रही लंपास केल्याचे लक्षात आले. फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक विजय मापारी यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहे. सदर फुटेज शुक्रवारी पोलिसांना देणार असल्याचे सांगण्यात आले. या चोरीने शहरात खळबळ उडाली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: 5 million lacs from finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.