महागाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By Admin | Updated: August 15, 2015 02:34 IST2015-08-15T02:34:49+5:302015-08-15T02:34:49+5:30

तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणाऱ्या ४६ ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक विभागाने अपात्र ठरविले आहे.

46 Gram Panchayat members disqualified from Mahagaon taluka | महागाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

महागाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

२४५ सदस्यांना नोटीस : खर्चाचा हिशेब सादर न करणे भोवले, निवडणूक विभागाची कारवाई
महागाव : तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणाऱ्या ४६ ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक विभागाने अपात्र ठरविले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करून पाच वर्षासाठी निवडणूक बंदी घालण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
महागाव तालुक्यात २२ एप्रिल रोजी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहभागी अनेक उमेदवारांनी निवडणुकीचा खर्चच सादर केला नाही. खर्च सादर करण्यासाठी प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली. यात महागाव तालुक्यातील २४५ उमेदवारांचा समावेश होता. मात्र यानंतरही त्यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नाही. त्यामुळे ४६ सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र घोषित करण्यात आलेल्यांमध्ये पिंपळगाव ईजाराच्या सुनीता खोकले, नंदा जंगले, अजय पंडागळे, बाळू रणमले पोर्णिमा जंगले, काळी दौ. येथील सरपंच गौतम रणवीर, श्रीनिवास मोरे, अर्चना वाघमारे, सैय्यद इरफान सैय्यद सुलेमान, रमेश ढगे, आशा मानतुटे, चंदा मेटकर, शाहिस्ता परवीन, आस्मा शेख समद यांचा समावेश आहे. काळी येथील १७ पैकी ९ सदस्य अपात्र ठरले आहे.
तीवरंग येथील इंदुबाई प्रताप राठोड, सीमा बालूसिंग जाधव, लोहराच्या ज्योती सरगर, चंद्रशेखर सरगर, लेवा येथील अर्चन खंदारे, राजू राठोड, मंगला खंदारे, कासोळाच्या रंजना फोफसे, रुख्माबाई डाखोरे, पृथ्वी चव्हाण, माळकिन्ही येथील मंगू जाधव, बेलदरी येथील निर्मला राठोड, मोहन जाधव, मंगला आडे, भोसाच्या संगीता सोनार, मलकापूरच्या मनाबाई रणमले, गोपिचंद खंदारे, कांताबाई डाखोरे, धनोडा येथील विलास कांबळे, पठाण अमजद शादूल, राजेंद्र घोरपडे, शोभा अडकिणे, गुंज येथील शकुंतला हाके, सुदाम राठोड, शेख फरजाना शेख अफजल, हिवरी येथील श्रीकांत पवार, सीता पवार, सविता चव्हाण, गुलाब पवार, विशाल राऊत, अरुण कुलदीपके, माळवागद येथील अमोल पवार यांचा समावेश आहे.
विद्यमान ४६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, त्यात काही सरपंचही आहेत. काळी दौ. चे सरपंच गौतम रणवीर, कासोळाच्या सरपंच रंजना फोफसे यांचा समावेश आहे. या कारवाईत अनेकांचे धाबे दणाणले आहे. २४५ सदस्यांपैकी काही जणांनी खर्चाचा हिशेब सादर केली, परंतु पोच घेतली नाही. आता त्यांच्याजवळ पुरावा नसल्याने ते काहीही करू शकत नाही. (शहर प्रतिनिधी)
सर्वाधिक फटका काळीला
अपात्रतेचा सर्वाधिक फटका काळी ग्रामपंचायतीला बसला आहे. येथे भाजपप्रणित पॅनलची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील टेमकर यांच्या गटाचे नऊ सदस्यांचे पद रद्द झाले. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला. यासोबतच पिंपळगाव येथील पाच सदस्यांची पदे रद्द झाली.

Web Title: 46 Gram Panchayat members disqualified from Mahagaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.