जिल्ह्यात एका मृत्यसह 42 जण पॉझिटिव्ह, 37 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:13 IST2021-02-07T19:13:43+5:302021-02-07T19:13:56+5:30

corona virus मृतकांमध्ये यवतमाळ येथील 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 201 रिपोर्ट प्राप्त झाले.

42 positive with one death in the district, 37 coronal free | जिल्ह्यात एका मृत्यसह 42 जण पॉझिटिव्ह, 37 कोरोनामुक्त

जिल्ह्यात एका मृत्यसह 42 जण पॉझिटिव्ह, 37 कोरोनामुक्त

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


मृतकांमध्ये यवतमाळ येथील 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 201 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 159 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 458 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14706 झाली आहे. 24 तासात 37 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13816 आहे. तर जिल्ह्यात एकूण 432 मृत्युची नोंद आहे.


सुरवातीपासून आतापर्यंत 145167 नमुने पाठविले असून यापैकी 144767 प्राप्त तर 400 अप्राप्त आहेत. तसेच 130061 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: 42 positive with one death in the district, 37 coronal free