चंद्रपूर जिल्हयातील अभियंत्याला ट्रेडिंगमध्ये ४१ लाखांनी गंडविले

By विशाल सोनटक्के | Published: May 31, 2024 08:20 PM2024-05-31T20:20:30+5:302024-05-31T20:20:40+5:30

यवतमाळात फसवणुकीचा प्रकार उघडकीस : शहर पाेलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा नाेंद

41 lakhs cheated an engineer in Chandrapur district in trading | चंद्रपूर जिल्हयातील अभियंत्याला ट्रेडिंगमध्ये ४१ लाखांनी गंडविले

चंद्रपूर जिल्हयातील अभियंत्याला ट्रेडिंगमध्ये ४१ लाखांनी गंडविले

यवतमाळ: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसा कमविण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. पुणे येथील कंपनीत अभियंता असलेल्या तरुणाला सुरुवातीला नफा मिळताच त्याला आणखी पैसे कमविण्याचा हव्यास चढला. मात्र, विड्राॅल करतेवेळी प्रतिसाद न मिळाल्याने ४१ लाख २५ हजाराने गंडविल्याचे यवतमाळात प्रवासादरम्यान लक्षात आले. याप्रकरणी शुक्रवारी यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात महिलेविरुद्ध तक्रार देण्यात आली.

रुपेश जयदास ठाकरे (३६), रा. हनुमाननगर, तुकून, जि. चंद्रपूर, असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ताे पुणे येथील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. १८ एप्रिल राेजी २० हजार रुपये गुंतवणूक केली. त्यात त्याला पाच हजार व तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला. ती रक्कम विड्राॅल न करता अधिक लाभापाेटी विविध बॅंक खात्यातून ४१ लाख २५ हजार रुपये गुंतवणूक केली. त्याचा एकूण लाभ एक काेटी २३ लाख रुपये एक्युआरच्या डिमॅट अकाउंटवर दाखविण्यात येत हाेता. पुणे येथून चंद्रपूरकडे जात असताना यवतमाळ येथे पाेहचला. यावेळी पैसाचे काम असल्याने एक्युआरच्या डिमॅट अकाउंटवर सहा लाख ७० हजार रुपये विड्राॅल करण्यासाठी रिक्वेस्ट टाकली. मात्र, पैसे विड्राॅल झाले नाही. कंपनीकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून काेणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे एक्युआर कंपनीद्वारे बनावट ऑनलाईन डिमॅट देऊन फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात येताच रुपेश ठाकरे याने यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अंजली नामक महिलेविरुद्ध कलम ४२०, भादंवी सहकलम ६६(सी),६६(डि), माहिती तंत्रज्ञान कायदा २०००प्रमाणे गुन्हा नाेंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

म्हणे, दुप्पट व त्यापेक्षाही जास्त पैसे
रुपेश ठाकरे हा मागील दाेन वर्षापासून वैयक्तिक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताे. १ एप्रिल राेजी अंजली नामक महिलेच्या माेबाईलवरून एक्युआर व्हाॅट्स गृपचा मॅसेज आला. एक्युआर नावाने डिमॅट सर्व्हिस देताे. आमच्यासाेबत डिमॅट अकाउंट तयार करून ट्रेडिंग केल्यास पैसे दुप्पट व त्यापेक्षाही जास्त करून देण्याचे आमिष दाखविले. त्यावरून अभियंता तरुणाने लगेच लिंक वरून पाठविलेले अप्लिकेशन डाउनलाेड केले. एका मॅसेजने अभियंता गंडविला गेला.

Web Title: 41 lakhs cheated an engineer in Chandrapur district in trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.