११ मजुरांचा ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:37+5:30

हैद्राबाद येथून जवळपास ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी रात्री पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना घेऊन तालुका कोरोना नियंत्रण समितीच्या ताब्यात दिले. प्रशासनाने या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करुन येथील नगर परिषदेच्या अण्णाभाऊ साठे मराठी प्राथमिक शाळेत त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली.

400 kilometer pedestrian journey of 11 laborers | ११ मजुरांचा ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास

११ मजुरांचा ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास

ठळक मुद्देपुसदमध्ये पोहोचले : तेलंगाणा राज्यातून मध्य प्रदेशकडे निघाले, आरोग्य तपासणी करुन भोजन व निवासाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने मध्यप्रदेशातील दोन महिलांसह ११ मजूर तेलंगाणात अडकून पडले. ते हैद्राबाद येथून जवळपास ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी रात्री पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना घेऊन तालुका कोरोना नियंत्रण समितीच्या ताब्यात दिले. प्रशासनाने या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करुन येथील नगर परिषदेच्या अण्णाभाऊ साठे मराठी प्राथमिक शाळेत त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली.
पुसदला पोहोचलेले सर्व मजूर लांजी ता. बालाघाट (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील दोन महिलांसह एकूण ११ मजूर तेलंगाणा राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेले होते. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे सर्व मजूर तेलंगाणा राज्यात अडकून पडले. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यामुळे त्यांनी पायदळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत ते रविवारी पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांना हे सर्व मजूर येताना आढळले. त्यांनी लगेच तहसीलदारांना माहिती दिली. त्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली.

कोरोनाची लक्षणे नाही
तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांच्या मार्गदर्शनात डॉ. दिनेश चव्हाण यांच्या पथकाने या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. या सर्वांना पालिकेच्या अण्णाभाऊ साठे मराठी प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले आहे.

Web Title: 400 kilometer pedestrian journey of 11 laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.