४०० तरुण रद्दी विकून देणार मदतीचा हात

By Admin | Updated: February 13, 2016 02:13 IST2016-02-13T02:13:18+5:302016-02-13T02:13:18+5:30

व्हॅलेंटाईन डे जवळ आला. तरुण-तरुणी आपापल्या योजनांमध्ये दंग आहेत. पण यवतमाळातील तरुण हा ‘प्रेमदिवस’ खऱ्याखुऱ्या प्रेमानेच साजरा करणार आहेत.

400 handfuls of junk sale | ४०० तरुण रद्दी विकून देणार मदतीचा हात

४०० तरुण रद्दी विकून देणार मदतीचा हात

कर्करोगग्रस्त कोमल : आगळा वेगळा ‘व्हेलेंटाईन डे’
यवतमाळ : व्हॅलेंटाईन डे जवळ आला. तरुण-तरुणी आपापल्या योजनांमध्ये दंग आहेत. पण यवतमाळातील तरुण हा ‘प्रेमदिवस’ खऱ्याखुऱ्या प्रेमानेच साजरा करणार आहेत. कॅन्सरग्रस्त गरीब तरुणीच्या शस्त्रक्रियेसाठी १४ फेब्रुवारीला ४०० तरुण चक्क रद्दी विकून पैसे गोळा करणार आहेत.
कोमल मोहनदास कुंभलवार या तरुणीला रक्ताचा कर्करोग झाला आहे. शस्त्रक्रियेसाठी १५ लाख रुपयांची गरज आहे. मात्र तिच्याकडे इतके पैसे नाहीत. या तरुणीच्या मदतीसाठी अखेर जिल्ह्यातील युवक सरसावले आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात युवकांसाठी प्रेरणादायी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरामध्ये राज्यभरातील युवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी अमरावतीच्या कोमल मोहनदास कुंभलवार या युवतीने आपली व्यथा युवकांपुढे मांडली. यावेळी सेवांकुरच्या तरूणांनी युवतीसाठी मदतीचा हात पुढे केला. १४ फेब्रुवारीला हे युवक दत्त चौक, आर्णी नाका, कळंब चौक, दर्डा नगरात रद्दी गोळा करण्यासाठी स्टॉल लावतील. रद्दी विकून गोळा झालेला निधी शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. घरातील रद्दी सेवांकूरच्या सदस्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रयास सेवांकूरचे शेखर सरकटे, महेश पवार, मनिषा काटे यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: 400 handfuls of junk sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.