४० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:22 IST2018-01-19T23:22:15+5:302018-01-19T23:22:27+5:30
कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जात राहिलेल्या त्रुट्यांमुळे ३९ हजार ८१६ शेतकरी लाभापासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. वंचित शेतकऱ्यांनी संस्थेचे सचिव आणि बँकेच्या निरिक्षकांशी संपर्क करावा, .......

४० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जात राहिलेल्या त्रुट्यांमुळे ३९ हजार ८१६ शेतकरी लाभापासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. वंचित शेतकऱ्यांनी संस्थेचे सचिव आणि बँकेच्या निरिक्षकांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी केले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - २०१७’ जाहीर केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या एक लाख ७० हजार सभासदांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. परिपूर्ण अर्ज असलेल्या एक लाख चार हजार ५५९ शेतकरी सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र अर्जात त्रूटी राहिल्याने जिल्ह्यातील काही शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिले आहे. ३९ हजार ८१६ शेतकरी या लाभाला मुकले आहेत.
कर्जमाफीच्या अनुषंगाने १२ जानेवारी रोजी पुणे येथे शासनामार्फत बँक व सहकार विभागातील अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात लाभापासून वंचित पात्र शेतकऱ्यांशी संपर्क करून माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी संबंधित संस्थेचे सचिव तसेच बँक निरीक्षकांशी संपर्क करण्याचे आवाहन अध्यक्ष गावंडे यांनी केले आहे.