शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
2
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
3
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
4
Piaggio ने आणली नवीन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर! 'आपे ई-सिटी अल्ट्रा' आणि 'आपे ई-सिटी FX मॅक्स', किंमत आणि फीचर्स काय?
5
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
6
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
7
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
8
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
9
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
10
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
11
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
12
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
13
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
14
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
15
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
16
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
17
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
18
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
19
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
20
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा

'एसटी' बँकेला ४० कोटी दिले, पगाराचे वांधे झाले

By विलास गावंडे | Updated: April 8, 2025 22:45 IST

गरज २७७ कोटींची, हाती २३२ कोटी ९६ लाख, ४५ कोटींची तूट

विलास गावंडे, यवतमाळ : बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या एस.टी. महामंडळाला पदोपदी नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. विविध प्रकारची देणी चुकविताना कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे वांधे निर्माण होत आहे. एप्रिल महिन्यातील पगाराची ७ तारीख निघून गेली. आवश्यक तेवढी रक्कम हाती नसल्याने पगाराविषयी अनिश्चितता कायम आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा २७७ कोटी रुपये लागतात. सरकारकडून मिळणाऱ्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीतून हा खर्च भागविला जातो. २७ मार्च २०२५ च्या आदेशानुसार सरकारने महामंडळाला प्रतिपूर्तीचे २७२ कोटी ९६ लाख रुपये दिले. पगारासाठी लागणाऱ्या रकमेपेक्षा पाच कोटी रुपये कमी देण्यात आले. मिळालेल्या रकमेतूनही ४० लाख रुपये एसटीबँकेची देणी देण्यात आली. आता एसटीकडे २३२ कोटी ९६ लाख रुपये शिल्लक आहेत; त्यामुळे आता पगाराकरिता ४५ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. सवलतमूल्याची पूर्ण प्रतिपूर्ती होतच नाही

सरकारकडून सवलतमूल्याची प्रतिपूर्ती कधीच पूर्ण येत नाही. पगार होईल तेवढीच रक्कम देण्यात येते. कधीकधी त्यालाही कात्री लावली जाते. परिणामी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात अडचणी येत आहेत. पी. एफ., ग्रॅच्युइटी, बँक कर्ज, एल. आय. सी. अशी साधारण ३५०० कोटी रुपयांची देणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊनही संबंधित संस्थांकडे वर्ग करण्यात आलेली नाही.मागितले ९२५ कोटी

वेतन आणि इतर थकीत देणी यांसाठी महामंडळाने शासनाकडे ९२५ कोटी रुपये इतका निधी मागितला होता. प्रत्यक्षात २७२ कोटी ९६ लाख रुपये एवढाच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांतील ४० कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड रक्कम एस. टी. बँकेकडे भरावी लागली.महामंडळातील ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या केवळ वेतनासाठी २७७ कोटी रुपये इतकी रक्कम लागते. विविध प्रकारच्या कपातीसह वेतन देण्यासाठी ४६० कोटी रुपये लागतात. दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला आणि खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल, असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते. प्रत्यक्षात एकाही महिन्यात गरजेइतका निधी सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

आर्थिक विवंचनेमुळे कर्मचारी तणावात काम करीत आहेत. त्याचा परिणाम गुणवत्तेवर व महामंडळाच्या एकूण कामकाजावर होत आहे.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :state transportएसटीbankबँकYavatmalयवतमाळ