आठ नगरपरिषदांमधील ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द

By Admin | Updated: November 4, 2016 02:03 IST2016-11-04T02:03:18+5:302016-11-04T02:03:18+5:30

आठ नगरपरिषद निवडणुकीच्या नामांकन छानणी प्रक्रियेत ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द झाले.

370 nominations of eight municipalities canceled | आठ नगरपरिषदांमधील ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द

आठ नगरपरिषदांमधील ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द

नगराध्यक्षपदाचे २८ अर्ज बाद : ११ नोव्हेंबरपर्यंत घेता येणार विड्रॉल
यवतमाळ : आठ नगरपरिषद निवडणुकीच्या नामांकन छानणी प्रक्रियेत ३७० उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. तर नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या २८ उमेदवारांनाही याचा जबर फटका बसला आहे. यामुळे २१६ जागांसाठी १२४७ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. ११ नोव्हेंबरपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये १०५ वॉर्डातील २१६ जागेसाठी १२४७ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये सर्वाधिक ३६८ नामांकन यवतमाळ नगरपरिषदेच्या क्षेत्रात आहे. यवतमाळात छानणी दरम्यान ९० नामांकन रद्द झाले.
यवतमाळात २८ वॉर्डात ५६ जागांसाठी ३६८ उमेदवार रिंंगणात आहेत.
वणी नगरपरिषदेमध्ये १३ वॉर्डातील २६ जागांसाठी १९२ उमेदवार रिंंगणात आहेत. छानणीदरम्यान ४३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. तर नगराध्यक्षपदाचे सात नामांकन रद्द झाले आहे. या ठिकाणी १७ उमेदवार रिंगणात आहेत.
पुसद नगरपरिषदेमध्ये १४ वॉर्डात २९ उमेदवार रिंंगणात आहेत. १६१ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. छानणीत ३८ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार रिंंगणात आहेत. ३ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले आहे.
दिग्रस नगरपरिषदेमध्ये ११ वॉर्डातील २४ जागांसाठी १२९ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ३३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले. नगराध्यक्षपदासाठी १६ पैकी १३ उमेदवार रिंंगणात आहेत. ३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले आहेत.
उमरखेड नगरपरिषदेमध्ये १२ वॉर्डातील २५ जागांसाठी ११५ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ५८ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले. नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारांपैकी १० उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहेत. तर ४ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले आहेत. दारव्हा नगरपरिषदेमध्ये १० वॉर्डामधील २० जागांसाठी ९१ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ४८ उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवार रिंंगणात होते. ९ उमेदवारांचे अर्ज कायम आहे. पाच उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. आर्णी नगरपरिषदेमध्ये ९ वॉर्डातील १९ जागांसाठी ९८ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी २९ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले. आर्णी नगरपरिषदेमध्ये ६ नगराध्यक्षपदाचे उमेदवार कायम आहेत. या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा एकही उमेदवारी अर्ज रद्द झाला नाही.
घाटंजी नगरपरिषदेमध्ये ८ वॉर्डातील १७ जागांसाठी ९३ उमेदवार रिंंगणात आहेत. या ठिकाणी ४२ उमेदवाराचे नामांकन रद्द झाले. तर नगराध्यक्षपदासाठी १२ उमेदवार रिंंगणात होते. या ठिकाणी ९ उमेदवार कायम आहे. ३ उमेदवारांचे नामांकन रद्द झाले आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: 370 nominations of eight municipalities canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.