३५ लाखांचे रस्ता सफाई यंत्र

By Admin | Updated: April 2, 2016 02:58 IST2016-04-02T02:58:16+5:302016-04-02T02:58:16+5:30

संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. हे बघून वेकोलिने उकणी कोळसा खाणीत तब्बल ३५ लाखांचे रस्ता सफाई करणारे मोबाईल यंत्र आणले आहे.

35 lakh road cleaning machines | ३५ लाखांचे रस्ता सफाई यंत्र

३५ लाखांचे रस्ता सफाई यंत्र

उकणी खाण : वेकोलिचा स्वच्छता अभियानात सहभाग
वणी : संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. हे बघून वेकोलिने उकणी कोळसा खाणीत तब्बल ३५ लाखांचे रस्ता सफाई करणारे मोबाईल यंत्र आणले आहे.
उकणी खाण व कॉलनीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी वेकोलिने ३५ लाख रूपये खर्च करून हे रस्ता स्वच्छ करण्याचे यंत्र आणले आहे. हे यंत्र डांबरी व सिमेंट रस्त्यावर फिरविले तर आपोआप रस्त्याची स्वच्छता करून माती व कोळसा भुकटी यंत्रात ओढून एका ठिकाणी जमा करते. कोळशाच्या भुकटीच्या धुमळीमुळे वणी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणची समस्या वाढत होती. रस्त्याच्या बाजूच्या शेतातील पिकांवर बारीक भुकटी बसत होती. त्यामुळ पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाणही वाढत होते.
यावर उपाय म्हणून वेकोलिचे महाप्रबंधक जी.एम. गोखले यांनी हे यंत्र थेट पंजाबातील लुधीयाना येथून बोलाविले आहे. हे यंत्र आजपर्यंत केवळ वेकोलित नागपूर जिल्ह्यातील गाडेगाव खाणीत उपलब्ध होते. त्यानंतर ते आता उकणी कोळसा खाणीत, उपलब्ध झाले आहे. या यंत्राचे नाव ‘रोड स्वीपिंग मशीन’ असून ते रस्ता स्वच्छ करून मातीची व कोळशाची भुकटी ओढून एक मोठ्या टँकमध्ये जमा करते. ही टँक यंत्रातच आहे. नंतर ही भुकटी बाहेर फेकली जाते. त्यानंतर रस्त्यावर हे यंत्र पाणीही मारते. या यंत्राला मोठे डीझल इंजिन बसविले आहे. तसेच हवा आत ओढण्याचे कॉम्प्रेशन बसविले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही ‘अ‍ॅटोमॅटिक’ चालते. यंत्रामागे भले मोठे पाईप असून यंत्र जेथे पोहोचू शकत नाही, तेथे पाईपने माती ओढण्याचे काम केले जाते. हे यंत्र रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी लाभदायक ठरले आहे. खनिज विकास निधीतून हे यंत्र येथील नगरपरिषदेला उपलब्ध झाले, तर शहरातील धुळीचे प्रदूषणही नक्कीच कमी होऊ शकते. (प्रतिनिधी)

Web Title: 35 lakh road cleaning machines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.