यवतमाळ जिल्ह्यातील झरी येथे विविध आजाराने ३५  जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 10:22 AM2021-02-10T10:22:26+5:302021-02-10T10:22:51+5:30

Yawatmal news; यवतमाळ जिल्ह्यातील झरी येथे गेल्या १५ दिवसात ३५  जनावरांचा विविध आजाराने मृत्यू झाला आहे . यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत वाढ झाली आहे .

35 animals die of various diseases at Zari in Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्यातील झरी येथे विविध आजाराने ३५  जनावरांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील झरी येथे विविध आजाराने ३५  जनावरांचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : जिल्ह्यातील झरी येथे गेल्या १५ दिवसात ३५  जनावरांचा विविध आजाराने मृत्यू झाला आहे . यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांच्या गाय, बैल आणि इतर जनावरांचे चारा खाणे बंद झाले होते . तसेच मलाद्वारे रक्तस्त्राव होत असल्याने जनावरांचा मृत्यू झाला आहे . पशुवैद्यकिय अधिकाऱयांनी उपचारही केले . पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही . उलट आजारी जनावरांचा मृत्यू झाला . प्रशासनाने आजाराचे निदान करावयाचे आदेश दिले आहेत . जर वेळीच व्यवस्थित उपचार झाले असते तर या जनावरांचे प्राण वाचले असते .  प्रशासनाने कुठेतरी निष्काळजीपणा केल्याचा आरोप शेतकरी करीत आहे .

Web Title: 35 animals die of various diseases at Zari in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय