लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष किशोर पेठकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या लोकअदालतीमध्ये तीन हजार ४५८ प्रकरणे निकाली काढण्यात आले.या प्रकरणांचे तडजोड मूल्य १३ कोटी ६६ लाख ११ हजार ५२७ रुपये होते. एक हजार ४७७ प्रलंबित आणि एक हजार ९८१ वादपूर्व अशी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी न्यायमूर्ती किशोर पेठकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायमूर्ती एम.आर.ए. शेख आदींनी वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्था व राष्ट्रीयकृत बँकेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्व पटवून देण्यात आले. त्यामुळे या लोकअदालतीला पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जिल्हाधिकारी, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, भूअर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्प अधिकारी, सहकारी बँका, विमा कंपन्यांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जितेंद्र बारडकर, न्यायालयीन कर्मचारी आदींनी या लोकअदालतीसाठी पुढाकार घेतला.
लोकअदालतीत ३४५८ खटले निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST
राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष किशोर पेठकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या लोकअदालतीमध्ये तीन हजार ४५८ प्रकरणे निकाली काढण्यात आले.
लोकअदालतीत ३४५८ खटले निकाली
ठळक मुद्देविधिसेवा प्राधिकरणाचा पुढाकार : प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांमध्ये आपसी तडजोड