३४ कोटींचे चुकारे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:07 IST2018-03-19T23:07:36+5:302018-03-19T23:07:36+5:30
शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप त्यांना मिळाले नाही. रविवारी गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकरी पैशासाठी भटकत आहे.

३४ कोटींचे चुकारे अडले
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप त्यांना मिळाले नाही. रविवारी गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकरी पैशासाठी भटकत आहे.
खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शेतकºयांनी शासकीय हमी केंद्राकडे धाव घेतली. या केंद्रांवर ५९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी झालेल्या या तुरीचे ३४ कोटींचे चुकारे शेतकºयांना अद्याप मिळाले नाही. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर २२ हजार २३२ शेतक ºयांनी ही तूर विक्रीकरीता नोंद केली. मात्र मनुष्यबळाअभावी हमी केंद्रांची खरेदीची गती मंदावली आहे. यातून अनेक शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत चार हजार २४७ शेतकºयांनी ५९ हजार २७ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. खरेदी झालेल्या या तुरीचा छदामही शेतकºयांच्या खिशात पडला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. रविवारी मराठी नववर्ष सुरू होत आहे. या दिवसाला शेतकºयांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र तुरीचे चुकारे न मिळाल्याने शेतकºयांना नववर्ष साजरे करणेही अवघड झाले आहे.
शासनच हमी घेवून शेतकºयांचे चुकारे थकवित असल्याने आता न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न शेतकºयांपुढे उपस्थित झाला असून आर्थिक अडचण वाढली आहे.
आॅनलाईनमुळे खाते रिकामेच
नाफेडच्या केंद्रांवर खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे शेतकºयांच्या खात्यात आॅनलाईन पद्धतीने जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात ते अद्याप खात्यात जमाच झाले नाही. शासनाच्या आॅनलाईन धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.
तुरीच्या चुकाºयाचा आढावा मार्केटींग फेडरेशनकडून घेण्यात आला. तत्काळ चुकारे मिळावे यासाठी वरिष्ठांशी पाठपुरावा करण्यात येत आहे.
- डॉ. राजेश देशमुख
जिल्हाधिकारी, यवतमाळ