शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

भुकेपोटी चोरल्या ३३ सायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:20 IST

आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नाही. माझी सायकल अनामत ठेवा असे म्हणून तो सायकलच्या बदल्यात ५० ते १०० रुपये घ्यायचा. एक-दोन नव्हे तब्बल ३३ सायकली चोरून त्याने कुणाकडे तरी अनामत ठेवल्या.

ठळक मुद्देदारिद्र्याची विवशता कारणीभूत : ५० ते २०० रुपयांत द्यायचा सायकली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नाही. माझी सायकल अनामत ठेवा असे म्हणून तो सायकलच्या बदल्यात ५० ते १०० रुपये घ्यायचा. एक-दोन नव्हे तब्बल ३३ सायकली चोरून त्याने कुणाकडे तरी अनामत ठेवल्या. पोलिसांनी या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतल्यावर धक्कादायक वास्तव पुढे आले. दारिद्र्यामुळे तो सायकली चोरुन आपल्या पोटाची भूक शमवायचा. त्याची ही कहाणी ऐकून पोलीसही दंग झाले.यवतमाळच्या वडगाव रोड (अवधूतवाडी) पोलिसांना एक विधीसंघर्षग्रस्त बालक सायकल चोरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक गोरख चौधरी यांनी त्या बालकाला ताब्यात घेतले. त्याची विश्वासाने चौकशी केली आणि त्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले. अभ्यासात कुशाग्रबुद्धीचा असलेल्या या बालकाची शाळा घरच्या दारिद्र्यामुळे अर्ध्यावरच सुटली. वडील केरकचरा गोळा करतात तर आई भटकंती करते. स्वत:चे घरही नाही. अशा परिस्थितीमुळे त्या बालकाला स्वत:च्या पोटाची खडगी भरावी लागत होती. यातूनच त्याने सायकल चोरण्यास सुरुवात केली.चोरलेली सायकल विकण्याऐवजी तो कुणाकडे तरी सायकल अनामत ठेवायचा. ही सायकल अनामत ठेवताना तो विविध बहाणे करायचा. आई आजारी असल्याचे सांगून संबंधितांकडून ५० ते २०० रुपये घ्यायचा. पैसे आले की मी सायकल घेऊन जातो, असेही काकूळतिला येऊन सांगायचा. त्यामुळे समोरचा व्यक्तीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा. त्याला मागितलेली रक्कम हातावर ठेवायचा. हे पैसे मिळाले की, तो थेट कुण्यातरी हॉटेलात जाऊन पोटाची खडगी भरायचा. गेल्या महिनाभरात त्याने तब्बल ३३ सायकली अशा पद्धतीने चोरुन अल्प किंमतीत गहाण ठेवल्या. जेवणाची सोय करणे एवढाच त्याचा चोरी मागचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने आपण चोरलेल्या प्रत्येक सायकलीची माहिती देत त्या सायकली कुठे-कुठे दिल्या हेही सांगितले. पोलिसांनी त्या ३३ सायकली जप्त केल्या. या सायकलींची किंमत एक लाख ८० हजार रुपयांच्या घरात आहे. ही कारवाई ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात नंदकुमार आयरे, सुगत पुंडगे व शोध पथकाने केली. त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले.