शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात ३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 17:27 IST

तवेरा वाहनातून यवतमाळ शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली.

यवतमाळ : तवेरा वाहनातून यवतमाळ शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली. या रकमेबाबत कुठलाही अधिकृत पुरावा देऊ न शकल्याने वाहनातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथून यवतमाळकडे एम.एच.१८-डब्ल्यू-५५३४ हे तवेरा कार येत होती. तपासणीसाठी मोहा फाट्यावर टोळीविरोधी पथकाने कार थांबविली. तपासणी केली असता प्लास्टिकच्या पोत्यात ३२ लाख १३ हजार ८०० रुपयांची रोकड आढळून आली. यात दोन हजार, पाचशे, दोनशे व १०० रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या रकमेबाबत वाहनातील राजेश रामलू बत्तीनीवार (४०) रा. चनाखा ता. पांढरकवडा, श्रीहरी लिंगय्या यादगीरीवार (५७) रा. शिरपूर जि. धुळे, देवराव आसन्ना रोडडावार (३३) रा. चनाखा ता. पांढरकवडा, बालराज राजेय्या कंकेटीवार (३८) रा.पेददाकोडू जि. सिंददीपेठ (तेलंगणा) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. ही रक्कम कोठून तरी चोरुन, लुटून किंवा फसवणूक करून आणल्याचा संशय बळावल्याने या सर्वांना टोळी विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrimeगुन्हाArrestअटक