रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण राज्यभरातील ४७ लाख शेतकऱ्यांना बँकांनी ५४ हजार कोटींचे कर्ज वितरित केले. यातील १६ लाख ९५ हजार २८२ शेतकऱ्यांकडे ३१ हजार कोटींचे कर्ज थकीत आहे. या थकीत कर्जाचा एनपीए ११.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे कर्ज थकल्याने येणाऱ्या हंगामात कर्ज वितरित करायचे कसे, असा प्रश्न बँकांपुढे निर्माण झाला आहे.
खरीप हंगामातील कर्ज वितरणाचे धोरण आणि कर्ज वसुली या विषयावर मुंबईत बँकर्सची बैठक झाली. या बैठकीत विधानसभेतील राजकीय पक्षांच्या कर्जमाफीच्या घोषणांमुळे शेतकरी कर्ज भरत नसल्याची बाब सर्वच जिल्ह्यातून पुढे आली आहे. या बैठकीला जनरल मॅनेजर, राज्यातील सर्व जिल्ह्यातील बँकांचे एलडीएम आणि राज्य सचिव उपस्थित होते.
बँका म्हणतात, वसुलीच नाही तर कर्ज वाटायचे कसे?
- बँकर्स कमिटीने येणाऱ्या खरीप हंगामात कर्ज वाटपासाठी धोरण ठरविताना वसुलीच नाही तर कर्ज वाटणार कसे, असा प्रश्न या बैठकीत उपस्थितीत केला. वाढत्या थकीत कर्जाने बँकांचा एनपीए ११.८० टक्क्यांवर पोहोचला आहे.
- शेतमालाचे दर घसरलेले आहेत. त्यात उत्पादन घटले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. प्रत्यक्षात सरकारकडून कुठल्याच हालचाली नसल्याने बँका आता चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.
२००९ च्या कर्जमाफीतील २५ टक्के तर २०१९, २०२४ चे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
- २००९ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांनी नव्याने कर्जाची उचल केली. या शेतकऱ्यांकडील २५ टक्के कर्ज अद्यापही भरणा झाले नाही.
- २०१९ मधील कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना नव्याने २ कर्ज मिळाले यातील अनेकांनी कर्जाची परतफेड केली नाही. गतवर्षी कर्जाची उचल करणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांनी पैसे भरले. इतर शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहेत.
अशी आहे बँकांची विभागनिहाय थकबाकीविभाग शेतकरी वितरित झालेले कर्जअमरावती सहा लाख ७,४२८ कोटीनागपूर चार लाख ४,४९७ कोटीछत्रपती संभाजी नगर १२ लाख ११, ८७० कोटीपुणे १२ लाख १५,९७७ कोटीकोकण पावणे दोन लाख २,२२६ कोटीनाशिक नऊ लाख १२,८९९ कोटी