शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेसाठी ३० हजार क्विंटल आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:12 IST

अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.

ठळक मुद्देकार्बाईडमुळे विक्री अर्ध्यावर : आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून फळांचा राजा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.यावर्षी दक्षिणात्य आंब्याची सर्वाधिक चलती आहे. या स्पर्धेत गावरान आंबा मागे पडला आहे. सध्या बाजारात आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूतून येणारा अांबा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यामध्ये बैगनपल्ली, तोतापुरी, लालबाग, चरखुस आणि हापूस आंब्याचा समावेश आहे. एक हजार कॅरेट बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. एका कॅरेटमध्ये २७ ते ३० किलो आंबे असतात. यानुसार ३० हजार क्विंटल आंब्यांची आवक बाजारात झाली आहे. त्याची विक्री करण्यासाठी २५० हातगाड्या आहेत. तर या तुलनेत गावरान आंबा मोजकाच बाजारात आला आहे. ६० ते १०० रूपये किलोपर्यंत आंब्याचे दर आहे. दक्षिणात्य आंब्याच्या स्पर्धेत गावरात आंबा असला तरी गावरान आंब्याला सर्वाधिक मागणी असते. मात्र गावरान आंबा बाजारात उपलब्धच होत नाही.अन्न व औषधी प्रशासन विभाग आहे तरी कुठे ?यवतमाळात कार्बाईडने पिकविलेली फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. रात्री हिरव्या कंच दिसणाऱ्या कैºया सकाळी पिवळ्या धम्म दिसतात. अर्थात त्या पिकलेला आंबा म्हणून ग्राहकांना थोपविल्या जातात. अशीच अवस्था बहुतांश फळांची आहे. परंतु त्यानंतरही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रुट मार्केटमध्ये धाड घालणे तर दूर साधी भेट दिल्याचेही ऐकिवात नाही. या अधिकाऱ्यांनी जणू फळविक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याची खुली सूट दिल्याचे दिसते. नगरपरिषदेचा आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करतो आहे.कृत्रिम पिकविण्यावर बंदीआंब्याला कृत्रिमरीत्या पिकविण्यावर बंदी आहे. नैसर्गिकरित्या आंबा पिकविण्यासाठी चार ते पाच दिवसाचा अवधी लागतो. यामुळे आंबा तयार होऊन विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पूर्वी ५० ते ६० हजार क्विंटल आंब्याची विक्री होत होती.