३० लाख वृक्षांची लागवड

By Admin | Updated: June 30, 2017 01:59 IST2017-06-30T01:59:27+5:302017-06-30T01:59:27+5:30

राज्य शासनाच्या वन विभागाने ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ ही योजना हाती घेतली.

30 lakhs plantation | ३० लाख वृक्षांची लागवड

३० लाख वृक्षांची लागवड

 ११२ रोपवाटीका : जिल्ह्यात एक कोटी वृक्षांची होणार निर्मिती
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाच्या वन विभागाने ‘एकच लक्ष चार कोटी वृक्ष’ ही योजना हाती घेतली. या योजनेतून एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ३० लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ‘रोप आपल्या दारी’ योजनेतून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अनुदानावर वृक्ष वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वन विभागासोबतच शासनाचे विविध ३२ विभाग तसेच समाजसेवी संघटना, शाळा व महाविद्यालय आदी सर्व मिळून ही महत्वाकांक्षी मोहीम राबविणार आहेत. सात दिवसात ३० लक्ष वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या वृक्षांच्या निर्मितीसाठी ११२ रोपवाटीका तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एक कोटी वृक्षांची निर्र्मिती कण्यात आली आहे. यामुळे आठ ते दहा हजार महिलांना रोजगार मिळाल्याचीही माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.
जिल्ह्यातील चार हजार ४३ ठिकाणी ३१ लाख ५६ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सॅटेलाईट आणि अद्यावत यंत्रणेच्या मदतीने यावर वॉच ठेवला जाणार आहे. माय प्लॅन्ट अ‍ॅपवर याची माहिती नोंदविली जाणार आहे. नवीन तंत्राच्या आधारे ही लागवड करण्यात येऊन या वृक्षांचे संगोपन व संवर्धनसुद्धा नियमितपणे करण्यात येणार प्रत्येक रोपट्याने मोठ्या वृक्षात रुपांतर झाले पाहिजे, ही या मागील शासनाची भूमिका असल्याचे यातून दिसून येते. वनकर्मचाऱ्यांना तीनशे गावे दत्तक दिले जाणार आहेत. यासोबतच एका कर्मचाऱ्याला ५०० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले जाणार आहे. या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. असे वनविभागाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यासोबतच वृक्ष लावण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांना ५० टक्के अनुदानावर वृक्ष मिळणार आहे. ‘रोप आपल्या दारी’ ही योजना प्रामाणिकपणे राबविल्या जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला सीसीएफ् जी. एस. चव्हान आणि एसीएफ् गिरजा देसाई यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: 30 lakhs plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.