शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

२९० कोटी गोत्यात; चार बँका चौकशीच्या फेऱ्यात : पोलिसांचा तपास संपेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:05 IST

Yavatmal : अपहारातील मुख्य सूत्रधार मोकाटच; पोलिस म्हणतात, शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अशा चार बँका गत काही महिन्यांत बुडाल्या. यात हजारो ठेवीदारांचे २९० कोटी रुपये अडकून पडले आहे. बाबाजी दाते महिला अर्बन, राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी आणि जनसंघर्ष अर्बन निधी प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र अपहाराचे मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांना गवसले नाही. तपास सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जात आहे. त्यामुळे कष्टाने कमविलेली जमापूंजी परत कधी मिळणार असा सवाल ठेवीदार करीत आहे.

सहकार विभागाच्या अखत्यारीत बहुतांश बँका आणि पतसंस्था येतात. या बँकांवर सहकार विभागाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बँका व पतसंस्थांनी रातोरात गाशा गुंडाळून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांनी चुना लावल्याचे समोर आले आहे. यामुळे या बँका व पतसंस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण नेमके कसे केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गत काही महिन्यात अपहाराच्या घटना पाहता ठेवीदारांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार विभागाकडून स्पेशल ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे. 

८५ जणांची जामीन रद्दसाठी न्यायालयात धावयवतमाळ येथील बाबाजी दाते १ महिला अर्बन बँकेत तब्बल २४२ कोटींचा अपहार झाला. या प्रकरणात तब्बल २०६ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यापैकी केवळ १२ आरोपींना अटक झाली. यात न्यायालयाने ९ आरोपींना जामीन दिला. तीन आरोपी कारागृहात असून, ७६ आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. १२१ आरोपी अजूनही मोकळेच आहेत. त्यांना अटक करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. दरम्यान, जामीन प्राप्त झालेल्या ८५ जणांचा जामीन रद्द करावा, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाद मागितली जात आहे.

'एसआयटी' स्थापन होऊनही 'जनसंघर्ष'दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लि.च्या सात शाखेत सहा हजार २०० खातेदारांची ४४ कोटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, चार आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलिस पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलिस अधीक्षकांनी पांढरकवडा एसडीपीओ रामेश्वर वैजने यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली आहे. मात्र महिना लोटला तरी खातेदारांना न्याय मिळालेला नाही. एका आरोपीचा पीसीआर तर दोघांचा एमसीआर १५ जानेवारीला संपणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

राजस्थानी मल्टिस्टेटचा 'इओडब्ल्यू'कडे तपास उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने ४४ ठेवीदारांना दोन कोटी ५१ लाख रुपयांनी गंडा घातला आहे. याप्रकरणी दोन ते तीन महिन्यांपूर्वी बिटरगाव पोलिस ठाण्यात शाखा व्यवस्थापक अभिजित पुरमे, अध्यक्ष चंदुलाल बियाणी व इतर १२ सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणात एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. या गुन्ह्याचा तपास नुकताच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे.

संत सेवालाल पतसंस्थेची चौकशी पुढे सरकेना पुसद येथील संत सेवालाल नागरी सहकारी पतसंस्थेत एक कोटी ५२ लाखांचा गैख्यवहार झाल्याचा आरोप १७१ ठेवीदारांनी केला आहे. लेखापरीक्षक यशवंत भोयर यांनी २०१६ ते २०२१ या कालावधीतील लेखापरीक्षण केले. तत्कालीन संचालक मंडळाने तब्बल तीन कोटी एक लाखाचे कर्ज वाटप करून इतर बँकांमध्ये २५ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचे दर्शविले. मात्र ते वाटप केलेले कर्ज व केलेली गुंतवणूक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ