११ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: October 27, 2016 01:02 IST2016-10-27T01:02:22+5:302016-10-27T01:02:22+5:30
शतकोत्तरी देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत बुधवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी

११ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात
पाच जणांची माघार : सार्वजनिक वाचनालय निवडणूक
पुसद : शतकोत्तरी देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत बुधवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नामांकन मागे घेणाऱ्यांची एकूण संख्या २७ अशी झाली आहे. बहुतांश जागांवर एकास एक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
स्थानिक देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालय हे १३० वर्ष जुने असून येत्या ६ नोव्हेंबर रोजी एकूण ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २८ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये अध्यक्षपदासाठी अॅड. वीरेंद्र राजे व त्यांच्याविरुद्ध योगेश राजे, उपाध्यक्षपदासाठी विक्रांत जिल्हेवार, अनघा गडम व प्रदीप आहाळे, सचिव पदासाठी प्रा. प्रकाश लामणे, चंद्रकांत गजबी, सहसचिव पदासाठी दिलीप धुमाळे विरुद्ध अजय क्षीरसागर, कोषाध्यक्षपदासाठी शाम जोशी यांच्याविरुद्ध रवीकिरण देशपांडे व संजय पोंगाडे आणि चार सर्वसाधारण सदस्यांसाठी श्रीकांत समुद्रे, गिरीष अनंतवार, राजेश वाळले, स्वप्नील चिंतामणी, अॅड. विनोद पाटील, विजय उबाळे, डॉ. उमेश रेवणवार, आशिष देशमुख, विवेक कंठे, नीलेश सिहस्ते, महेश गादेवार, अजय चिद्दरकर तर महिला सदस्य इरावती अत्रे आदींचा समावेश आहे. नागरिकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. (प्रतिनिधी)