‘जेडीआयईटी’च्या २५ विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित कंपनीत निवड

By Admin | Updated: May 13, 2015 02:16 IST2015-05-13T02:16:41+5:302015-05-13T02:16:41+5:30

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थ्यांची पुणे येथील आय-नेट ई-सिस्टिम अँड सॉफ्टवेअर या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

25 JDIT students selected in Pune's nominated company | ‘जेडीआयईटी’च्या २५ विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित कंपनीत निवड

‘जेडीआयईटी’च्या २५ विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित कंपनीत निवड

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थ्यांची पुणे येथील आय-नेट ई-सिस्टिम अँड सॉफ्टवेअर या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. इन कॅम्पस ड्राईव्हमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात ट्रेनी इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. त्यांना वार्षिक एक लाख ८० हजार रुपयांचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे.
अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या यशस्वी पार करत त्यांनी या पदासाठी आपले स्थान निश्चित केले. यामध्ये अंतिम वर्ष इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतून अश्वगंधा मून, अश्विनी भांदककार, स्नेहल चव्हाण, पायल मालेकर, कोमल नस्करी, रवी डबले, हर्षदा हार्डे, स्नेहा बोरकर, प्राची कोहाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेतून विशाल डहाके, वाहिद खान, पल्लवी झामरे, मोनिका ठाकरे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतून सिद्धार्थ येरावार, लिझा दाइया, अंशू जयस्वाल, अदिती देशपांडे, अनुश्री ढोंगे, साकेत आदमने, मयूरी मुंदडा, पूजा चव्हाण, स्नेहंका भोसले, आकाश शेंडे, पीयूष उत्तरवार, वैष्णवी एंबरवार यांचा समावेश आहे. त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे. महाविद्यालयाकडून मिळालेले मार्गदर्शन हे या विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक आहे. (वार्ताहर)

Web Title: 25 JDIT students selected in Pune's nominated company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.