२५ ग्रामपंचायतकडे फॉगिंग मशीनचा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST2021-09-21T04:47:55+5:302021-09-21T04:47:55+5:30

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात डेंग्यूचा कहर झाला आहे. दररोज डेंग्यूचे रूग्ण वाढत आहे, तर काही रूग्णांना आपले प्राणही गमवावे ...

25 Gram Panchayats do not have fogging machines | २५ ग्रामपंचायतकडे फॉगिंग मशीनचा नाही

२५ ग्रामपंचायतकडे फॉगिंग मशीनचा नाही

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात डेंग्यूचा कहर झाला आहे. दररोज डेंग्यूचे रूग्ण वाढत आहे, तर काही रूग्णांना आपले प्राणही गमवावे लागले. जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता, जिल्हाधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले आहे. तालुका प्रशासन यावर काय उपाययोजना करीत आहे, याचा कानोसा घेतला असता, तालुक्यात ५७ ग्रामपंचायत असून त्यापैकी २५ ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीनच नसल्याची माहिती मिळाली, तर उर्वरित ज्या ४२ ग्रामपंचायतीकडे मशीन असल्याची माहिती आहे, त्यापैकी बहुतांश ग्रामपंचायतीच्या मशीन बंद आहे. उपाययोजनेचा भाग म्हणून फॉगिंग मशिनद्वारे फवारणी केल्याचे प्रकार अत्यल्प आहे. तर आजही अनेक ग्रामपंचायतने नाली सफाई, पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग टाकणे, साफसफाई, चिखल पडलेल्या ठिकाणी मुरूम टाकणे, आदी आवश्यक उपाययोजना ही करीत नसल्याची ओरड जनतेतून होत आहे. तर शहरातही दररोज डेंग्यूचे रूग्ण मिळत असताना नगरपंचायत प्रशासन फवारणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. नगरपंचायतकडे संपूर्ण शहरासाठी एकच फॉगिंग मशीन असून तीही व्यवस्थित काम करीत नसल्याचीच माहिती आहे.

Web Title: 25 Gram Panchayats do not have fogging machines