सदोष वजनमापांची २४२ प्रकरणे उघड
By Admin | Updated: July 9, 2015 02:28 IST2015-07-09T02:28:58+5:302015-07-09T02:28:58+5:30
बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूचे वजन बरोबरच असेल याची खात्री देणे आज कठीण आहे.

सदोष वजनमापांची २४२ प्रकरणे उघड
सात हजार प्रकरणे : ४१ लाखांचा महसूल
यवतमाळ : बाजारातून खरेदी केलेल्या वस्तूचे वजन बरोबरच असेल याची खात्री देणे आज कठीण आहे. याचे कारणही तसेच आहे. वस्तू डोळ्यादेखत मोजली तरी त्यातील वजन मात्र धोका देणारे असते. असे प्रकार दररोज घडतात. मात्र क्षुल्लक बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
पण वजनमापे विभागाने केलेल्या तपासणीत अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत. सात हजार १७७ व्यावसायिकांच्या मजनमापांची तपासणी करण्यात आली. त्यात २४२ व्यावसायिकांच्या वजनमापामध्ये दोष आढळून आला. अशा व्यावसायिकांवर खटला भरण्यात आला आहे.
जिल्ह्यात ठोक परवानाधारक विक्रेत्यांची संख्या १० हजारांच्या वर आहे. किरकोळ भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांची संख्या फार मोठी आहे. वैधमापन शास्त्र विभाग विक्रेत्यांचे वजन मोजत नाही. त्यासाठी मोहीम राबवित नाही. परिणामी व्यावसायिकांनी याचा चांगलाच फायदा घेतला आहे.
भाजी आणि फळ खरेदीसोबत बाजारातून धान्य खरेदी केल्यानंतर घरी मोजले तर त्यात तूट आढळते. यामध्ये विक्रेते वजनाचे सील काढतात. वजन खालून घासले जाते. अथवा तराजूमध्ये तशी सोय करून घेतली जाते. यातून ग्राहकांची लूट होते. खुद्द वैधमापनशास्त्र विभागाने मापे प्रमाणित करून घेतले. यातून ४१ लाख ३३ हजार १४७ रुपयंचा महसूल मिळविला.
कुठल्याही पदार्थाची विक्र ी वेस्टन बंद डब्यात विकणे गरजेचे आहे. यावर कायदेशीर माहिती असणे अपेक्षित आहे. असे असताना वर्षभरात २४२ प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले. या प्रकरणात व्यावसायिकांवर खटले भरण्यात आले. यातील सहा प्रकरणात चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सदोष वजनमापे वापरणाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. (शहर वार्ताहर)