बोगस मनिऑर्डर तयार करून लाटले २४ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 21:49 IST2021-02-24T21:48:52+5:302021-02-24T21:49:26+5:30
महागाव (यवतमाळ) : येथील उप डाकघरात उप डाकपालानेच ४६० मनिऑर्डर तयार करून तब्बल २४ लाख १५ हजार रुपये हडप केले.

बोगस मनिऑर्डर तयार करून लाटले २४ लाख
महागाव (यवतमाळ) : येथील उप डाकघरात उप डाकपालानेच ४६० मनिऑर्डर तयार करून तब्बल २४ लाख १५ हजार रुपये हडप केले. त्याचा हा कारनामा वर्षभरापूर्वीपासून सुरू होता. हा प्रकार उघडकीस आल्याने पोस्टामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
गजानन घोडे असे उप डाकपालाचे नाव आहे. त्याने २८ मार्च २०२० मध्ये बनावट ग्राहकांच्या नावाने ४६० मनिऑर्डर पाठविल्याचे दाखवून पोस्टाच्या खात्यातील २४ लाख १५ हजार रुपये हडप केले. उप डाकघराचे ऑडिट झाल्यानंतर या घोटाळ्याची कुणकुण लागली. वरिष्ठांकडून चौकशी करण्यात आल्यानंतर या अपहाराची व्याप्ती पुढे आली. या अपहार प्रकरणात उप डाकघरातील आणखी एका कर्मचाऱ्याचे नाव पुढे येत आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे. मास्टर माईंड गजानन घोडे याच्याविरोधात महागाव पोलिसांनी भादंवि ४२०, ४०९ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.