आश्रमशाळेचा २४ क्ंिवटल गहू जप्त

By Admin | Updated: November 16, 2016 00:27 IST2016-11-16T00:27:40+5:302016-11-16T00:27:40+5:30

अनुसूचित जाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी असलेल्या गहू परस्पर घरी नेण्याचा प्रकार पुरवठा विभागाच्या धाडीत उघडकीस आला.

24 Kgft of Ashramshala seized wheat | आश्रमशाळेचा २४ क्ंिवटल गहू जप्त

आश्रमशाळेचा २४ क्ंिवटल गहू जप्त

यवतमाळ : अनुसूचित जाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी असलेल्या गहू परस्पर घरी नेण्याचा प्रकार पुरवठा विभागाच्या धाडीत उघडकीस आला. शहरातील विवेकानंद सोसयाटीतील एका घरात तब्बल २४ क्ंिवटल गहू रंगेहाथ पकडण्यात आला. ही कारवाई मंगळावारी दुपारी करण्यात आली.
येथील आंबेडकरनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा आणि मातोश्री भीमाई अनुसूचित जाती आश्रमशाळा धानोरा (ता. बाभुळगाव) येथे पुरवठा करण्यासाठी शासकीय गोदामातून २४ क्विंटल गहू काढण्यात आला. त्यासाठी चलान क्रमांक ६४ नुसार ८ नोव्हेंबरला गव्हाची उचल करण्यात आली. हा गहू मेटॅडोअर (क्रं.एम एच ३७ एम ६००९) या वाहनातून विवेकानंद सोसायटीतील उत्तमराव गजानन चंदने यांच्याकडे उतरविल्या जात असल्याची गोपनिय माहिती पुरवठा विभागाला मिळाली. त्यावरून मंगळवारी दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, तहसीलदार सचिन शेजाळ, पुरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांनी धाड मारली. येथे आरोपीने त्यांच्या घरात सात क्विंटल गहू उतरविला होता तर उर्वरीत गहू हा मेटॅडोअर मधून उतरविने सुरू होते. पुरवठा विभागाच्या पथकाने पंचनामा करून धान्याने भरलेला मेटॅडोर वडगावरोड पोलीसांच्या स्वाधिन केला. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांच्या तक्रारीवरून वाहन चालक रघुनंदन रामस्वरूप चपरिया आणि घरमालक उत्तमराव गजानन चंदणे यांच्या विरोधात जीवनावश्यक कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुरवठा विभागाच्या कारवाईने पून्हा एकदा आश्रमशाळेच्या धान्याचा काळबाजार उघड झाला. आता या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास धान्य काळ््या बाजारात विकणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अन्यथा दोघांवर कारवाई करून प्रकरण थंडबस्त्यात ठेवल्यास या रॅकेटमधील बड्या माश्यांना अभय देण्याचेच काम होईल. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 24 Kgft of Ashramshala seized wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.