२२४ गिट्टी खदानींचे वीज रिडींग संशयास्पद

By Admin | Updated: August 18, 2015 02:33 IST2015-08-18T02:33:53+5:302015-08-18T02:33:53+5:30

जिल्ह्यातील २२४ गिट्टी खदाणींच्या वीज वापर, उपलब्ध रिडींग व त्याद्वारे महावितरण कंपनीकडून बनविल्या

224 calories, electricity readings suspicious | २२४ गिट्टी खदानींचे वीज रिडींग संशयास्पद

२२४ गिट्टी खदानींचे वीज रिडींग संशयास्पद

यवतमाळ : जिल्ह्यातील २२४ गिट्टी खदाणींच्या वीज वापर, उपलब्ध रिडींग व त्याद्वारे महावितरण कंपनीकडून बनविल्या जात असलेल्या देयकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. म्हणून या गिट्टी खदाणींच्या गेल्या तीन वर्षातील वीज देयकांची व वीज वापराची सखोल चौकशी करण्याचे आदेश वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हाभरातील गिट्टी खदाणी (क्रशर) च्या वीज वापराचा मुद्दा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे चर्चेला आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगर खणून त्याचे मशीनद्वारे बारिक तुकडे करणाऱ्या क्रशरचे देयक वीज वापराच्या तुलनेत बरेच कमी असल्याची बाब सिंह यांच्या निदर्शनास आली. गिट्टी क्रशरचे वितरण कंपनीच्या खासगी एजंसीकडून घेतल्या जाणाऱ्या रिडींगवर जिल्हाधिकाऱ्यांना संशय आला. हे रिडींग मॅनेज तर नाही, पर्यायाने त्या आधारे क्रशरला दिले जाणारे वीज देयक महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान करणारे तर नाही ना, अशी शंका आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणीचे निर्देश दिले. एवढेच नव्हे, तर आपल्याकडे उपलब्ध २२४ गिट्टी क्रशरची यादीही वीज कंपनीला सादर केली. जिल्ह्यात किती क्रशरची सार्वजनिक बांधकाम खाते व वीज वितरण कंपनीकडे नोंदणी आहे, त्यातील किती क्रशरचे वीज मीटर सुरू आहे, त्यांच्याकडे किती माल तयार होतो, त्यासाठी किती वीज लागते, त्यानुसारच त्यांना देयके दिले जाते काय याची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी वीज महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विजय भटकर यांना दिले आहे. क्रशरचा गेल्या तीन वर्षातील वीज वापर, रिडींग, देयक याची तपासणी केली जाणार आहे. एक ब्रास मालासाठी किमान तीन युनिट वीज लागते. या निकषानुसार गेल्या तीन वर्षात देयक आकारले गेले की नाही, याची तपासणी होत आहे. वीज वितरण कंपनीचा आयटी विभाग त्यासाठी कामी लागला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

रिडींग घेणारेच मॅनेज करून देतात युनिट
४जिल्ह्यात अनेक क्रशरचे वीज मीटर, रिडींग व पर्यायाने देयक संशयास्पद असल्याची माहिती आहे. रिडींग घेणाऱ्यांनीच अनेक विद्युत मीटर ‘अ‍ॅडजेस्ट’ करून दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एखाद्या व्यापारी-व्यावसायिकाला जेवढे दरमहा वीज बिल वितरण कंपनीकडून मिळते तेवढेच वीज बिल अनेक गिट्टी खदाणींना आकारले जात असल्याची माहिती आहे. यावरून वीज मीटरमध्ये किती मोठ्या प्रमाणात ‘सेटिंग’ केले गेले आहे, ही बाब लक्षात येते. या प्रकरणात वीज वितरण कंपनीची संबंधित तेथील वरिष्ठ व कनिष्ठ यंत्रणाही गुंतलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: 224 calories, electricity readings suspicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.