कोसारा येथे २२ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:03 IST2020-09-02T15:03:44+5:302020-09-02T15:03:50+5:30
आत्महत्येचे कारण वृत्त लिहीस्तोवर कळु शकले नाही.

कोसारा येथे २२ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या
यवतमाळ :मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे २२ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना ता. १ सप्टेंबर रोज मंगळवारी सकाळी ११ वाजतच्या दरम्यान घडली.
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कोसारा येथील धम्मदिप दिवाकर वनकर या बावीस वर्षीय युवकाने मंगळवारी सकाळी ११ वाजेदरम्यान सावंगी शिवारात जाऊन कीटकनाशक प्राशन केले. ही माहिती कुटुंबियांना कळताच त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण वृत्त लिहीस्तोवर कळु शकले नाही. त्याच्या मागे आई,व तीन बहीणी आहेत. या घटनेची फिर्याद वासुदेव टेनपे यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर मारेगांव पोलीसानी मर्ग दाखल केला.