सरपंचपदी २२ महिला
By Admin | Updated: May 8, 2015 00:04 IST2015-05-08T00:04:51+5:302015-05-08T00:04:51+5:30
तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरूवारी दुपारी २ वाजता निवडणूक घेण्यात आली.

सरपंचपदी २२ महिला
वणी : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरूवारी दुपारी २ वाजता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये २२ गावांच्या सरपंचपदी महिला आरूढ झाल्या आहेत. बहुतांश ठिकाणी सरपंच व उपसरपंचाच्या निवडी अविरोध झाल्या.
केवळ मानकी, लालगुडा, मारेगाव-कोरंबी, उमरी, बेलोरा, लाठी या ठिकाणी मतदान घेण्यात आले. शिरपूर येथे उपसरपंच पदासाठी समान चार-चार मते पडल्याने ईश्वरचिठ्ठीने सुभाष निर यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ पडली. तेथे सरपंचपदी मिनाक्षी कनाके, उपसरपंचपदी सुभाष निर, दहेगाव येथे सरपंचपदी निर्मला नगराळे, उपसरपंचपदी बाळू निखाडे, पेटूर येथे सरपंचपदी विमल झाडे, उपसरपंचपदी मंगला ढेंगळे, भालर येथे सरपंचपदी नरेंद्र वरारकर, उपसरपंचपदी माधुरी हेपट, कुंभारखणी येथे सरपंचपदी बाबाराव घनकसार, उपसरपंचपदी संतोष मेश्राम, मानकी येथे सरपंचपदी अरूणा काकडे, उपसरपंचपदी विनोद काकडे, परसोडा येथे सरपंचपदी संगिता काकडे, उपसरपंचपदी बालाजी म्हसे, सावंगी येथे सरपंचपदी प्रवीण पिदुरकर, उपसरपंचपदी माधव ढवस, उकणी येथे सरपंचपदी संगिता खाडे, उपसरपंचपदी नरेंद्र बल्की, नायगाव खु. येथे सरपंचपदी माया देठे, उपसरपंचपदी मनोज कोरडे यांची निवड झाली. सुकनेगाव येथे सरपंचपदी पंकज निखाडे, उपसरपंचपदी शुभांगी पावडे, सोनेगाव येथे सरपंचपदी विलास बरडे, उपसरपंचपदी सुनीता उमेर, लालगुडा येथे सरपंचपदी मिना बुरडकर, उपसरपंचपदी बापूजी पेंदोर, निवली येथे सरपंचपदी विजया पाटील, उपसरपंचपदी मंगल बलकी, शेलू बु. येथे सरपंचपदी सुमन पाचभाई, उपसरपंचपदी बंडू मालेकार, पिंपळगाव येथे सरपंचपदी किरण कोडापे, उपसरपंचपदी महेंद्र ठोंबरे, कवडशी येथे सरपंचपदी महादेव दातारकर, उपसरपंचपदी गीता आत्राम, सावर्ला येथे सरपंचपदी विनोद चोपणे, तर उपसरपंचपदी अविनाश सोमलकर यांची निवड करण्यात आली.
मारेगाव को. येथे सरपंचपदी किरण गेडाम, उपसरपंचपदी योगेश खंडाळकर, वडजापूर येथे सरपंचपदी प्रफुल ठाकरे, उपसरपंचपदी सुनिता डोहे, विरकुंड येथे सरपंचपदी उषा पिंपळकर, उपसरपंचपदी मोहन सातपुते, उमरी येथे सरपंचपदी शारदा माथनकर, उपसरपंचपदी राजेश सिडाम, मोहोर्ली येथे सरपंचपदी अरविंद डाहुले, उपसरपंचपदी विठ्ठल कोडापे, बेलोरा येथे सरपंचपदी प्रकाश खुटेमाटे, उपसरपंचपदी आर्तीका राखुंडे, बेसा येथे सरपंचपदी प्रमोद देवतळे, उपसरपंचपदी संध्याताई वाघमारे, लाठी येथे सरपंचपदी दीपाली पाटील, उपसरपंचपदी गॅरी जोसेफ, मुर्धोणी येथे सरपंचपदी वैजंती आवारी, उपसरपंचपदी प्रकाश धुळे, नायगाव बु. येथे सरपंचपदी रोशनी बोबडे, उपसरपंचपदी देविदास चिकनकर, नवरगाव येथे सरपंचपदी योगिता जेनेकार, उपसरपंचपदी मारोती देवाळकर, निलजई येथे सरपंचपदी मंजू डंभारे, उपसरपंचपदी अनिल कोतावार, पिंपरी का. येथे सरपंचपदी रज्जू डोंगरकर, उपसरपंचपदी महेंद्र देवाळे, पुनवट येथे सरपंचपदी रक्षणा गजभिये, उपसरपंचपदी बंडू पिदुरकर, तरोडा येथे सरपंचपदी किरण गोवारदीपे, उपसरपंचपदी मधुकर झोडे, वागदरा येथे सरपंचपदी सारिका तोतडे, उपसरपंचपदी भूषण पावडे, घोन्सा येथे सरपंचपदी निरूपमा पथाडे, तर उपसरपंचपदी अनिल साळवे यांची निवड झाली. शेवाळा व महाकालपूर येथील सरपंच, उपसरपंच पदांची निवडणूक तूर्तास रद्द करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)