घाटंजीतील २२ गावे टंचाईमुक्त होणार
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:58+5:302016-04-03T03:51:58+5:30
पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेले तालुक्यातील २२ गावे लवकरच टंचाईमुक्त होणार आहे.

घाटंजीतील २२ गावे टंचाईमुक्त होणार
राजू तोडसाम : आर्णी विधानसभेसाठी आठ कोटी मंजूर
घाटंजी : पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेले तालुक्यातील २२ गावे लवकरच टंचाईमुक्त होणार आहे. विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीमधून कामे हाती घेतली जाणार आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांकरिता आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार राजू तोडसाम यांनी दिली.
घाटंजी तालुक्यातील जरुर, कोपरी खु., पार्डी कालेश्वर, सेवादास नगर, अंबेझरी, शिरोली, हेटी तांडा, केळापूर तांडा, तरोडा, माणूसधरी, तिवसाळा, मांडवा, माथनी, राजेगाव, शिवणी, निबर्डा, ससाणी, पाटापांगरा, पंगडी, पांढुर्णा बु., बोधडी, कुर्ली येथे विशेष नळदुरूस्तीची योजना राबविली जाणार आहे. पाणीटंचाई कार्यक्रम सन २०१५-१६ अंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून ही कामे होणार आहेत.
आर्णी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांना पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागते. काही गावांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जातो. हा प्रश्न गांभिर्याने घेत पाठपुरावा करण्यात आला. शासनस्तरावर निधीची मागणी रेटून धरली. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहे.
केळापूर, घाटंजी, आर्णी तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत. जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना सन २०१५-१६ अंतर्गत एक कोटी ७१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
यातून केळापूर तालुक्यातील धरमगोटा पोड, शिवनाळा पोड, वेडद पोड, कारेगाव ब., वळवाट, घाटंजी तालुक्यातील कापशी, कोपरी, कालेश्वर पार्डी आदी गावांमध्ये कामे हाती घेतली जाणार आहे. ठक्करबाप्पा योजनेतून केळापुरातील मांजरी पोड, बोथ अंबोरा, भाडउमरी, बहात्तर तर घाटंजी तालुक्यातील पार्डी कालेश्वर, कोपरी कापशी, रहाटी, मोवाडा, कोप्रा वन, मांडवा येथे कामे केली जाणार आहे.
विशेष नळदुरूस्ती योजनेतून केळापूर, घाटंजी आणि आर्णी तालुक्यातील नळयोजनेची कामे होणार आहेत. यात केळापूर येथील पिंप्री पोड, अर्ली, बोरगाव, किन्हाळा, कोठोडा, सुन्ना, उमरी रोड, घुबडी, झुली, चिखलधरा पोड, जिरा, अडणी आणि आर्णी तालुक्यातील भंडारी शिवर, साखरा, काकडदरा, खंडाळा, देऊरवाडी बु., लोणबेहळ, म्हसोला, बोरगाव दा., दहेली, देवगाव, सायखेडा, वरुड भ., नवनगर, शेलू ब्राह्मणवाडा, शेंदुरसनी, कोसदणी, उमरी पठार, अंबोडा, सुधाकरनगर, कुऱ्हातळणी, जवळा, कृष्णनगर आदी गावे टंचाईमुक्त होणार असल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब चावरे, विपीन राठोड, विलास पाटील गरड, राजू शुक्ला, अशोक राठोड, जीवन मुद्दलवार, रमेश उग्गेवार, संतोष सिर्तावार, अरुण देऊळकर, सुबोध काळपांडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)