शनिवारी जिल्ह्यात धावल्या २२ एसटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:00:42+5:30
जिल्ह्यातील बस वाहतूक सेवा पूर्ववत होण्यास वेग आला आहे. मात्र अद्यापही परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. काही कर्मचारी कामावर परत येत असले तरी बहुतांश कर्मचारी महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासन पेचात पडले आहे. तर ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल अद्यापही सुरूच आहे. दरम्यान गुरुवारी यवतमाळातील एक कर्मचारी बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

शनिवारी जिल्ह्यात धावल्या २२ एसटी बस
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपातील काही कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटी बस मार्गावर सोडण्याची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी चार आगारांतून २२ बसद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात आली. दरम्यान, नेर आगाराचा एक निलंबित चालक कामावर हजर झाला आहे.
एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. यातील काही कर्मचाऱ्यांवर निलंबन, सेवासमाप्ती आदी प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, संपातील काही कर्मचारी कामावर येत आहेत. याच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बस सोडल्या जात आहेत. बुधवारी यवतमाळ आगारातून सहा, वणी सात, पांढरकवडा आठ आणि नेर आगारातून एक बस सोडण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील बस वाहतूक सेवा पूर्ववत होण्यास वेग आला आहे. मात्र अद्यापही परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. काही कर्मचारी कामावर परत येत असले तरी बहुतांश कर्मचारी महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासन पेचात पडले आहे. तर ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल अद्यापही सुरूच आहे. दरम्यान गुरुवारी यवतमाळातील एक कर्मचारी बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या कर्मचाऱ्याची अन्यायकारकरीत्या पुसद आगारात बदली करण्यात आल्यामुळे तो निराशेने घरातून निघून गेल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची तीव्रता आणखी एकदा सर्वांच्या नजरेपुढे आली.
शनिवारी जिल्ह्यात विविध आगारातून २२ बसफेऱ्या सोडल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला. मात्र जिल्ह्यातील प्रवाशांची संख्या बघता या बसफेऱ्या अगदीच तोकड्या ठरल्या. संप कायमचा मिटल्याशिवाय जिल्ह्यातील सर्व आगारातून नियोजित बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सोडणे जवळपास अशक्य आहे. शासन स्तरावरून संप मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत.
सोमवारपर्यंत कामावर परतण्याचा ‘अल्टिमेटम’
- महिनाभरापासून कर्मचारी संपावर गेल्याने बसफेऱ्यांवर विपरित परिणाम झाला आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असा अल्टिमेटम परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत रुजू न झाल्यास गंभीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी किती कर्मचारी या अल्टिमेटमला जुमानतात याकडे नजरा आहे.